Annual Horoscope 2024 - सिंह रास : जीवनाला कलाटणी अन् भाग्योदयाची संधी; वर्षभरात कसं असेल आपलं 'राशिभविष्य'

माणसाने कष्ट कसे करावेत? जगात कसे उभे राहावे? प्रगती कशी करावी? हे दर्शविणारी सिंह ही रास आहे.
Annual Horoscope 2024 Leo Horoscope
Annual Horoscope 2024 Leo Horoscopeesakal
Updated on
Summary

घरचे कुलदैवत, मूळ पुरुष, घराण्याचा कर्ता पुरुष या साऱ्या बाबींचे कारकत्व असलेली ही रास आहे.

-आनंद एस. मत्तीकोप-कुलकर्णी, बेळगाव

Leo Horoscope : माणसाने कष्ट कसे करावेत? जगात कसे उभे राहावे? प्रगती कशी करावी? हे दर्शविणारी सिंह ही रास आहे. घरचे कुलदैवत, मूळ पुरुष, घराण्याचा कर्ता पुरुष या साऱ्या बाबींचे कारकत्व असलेली ही रास आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी सूर्याकडे तोंड करून कधीही भांडण-तंटे, वादविवाद करू नयेत.

तसेच त्या दिशेला तोंड करून कोणतीही अस्वच्छता होणार नाही, याची काळजी घ्यावी. आतापर्यंत जे जे मोठे व असाध्य रोग झालेले आहेत, ते सर्व सूर्याच्या अपमानामुळेच झाले आहेत, हे लक्षात ठेवावे. यावर्षी दशमातील गुरू तुम्हाला स्वतःची वास्तू, नोकरीत उच्चपद, राजकारणात यश, मानसन्मान, पैसाअडका, वाहन योग या दृष्टीने शुभ फलदायक आहे.

Annual Horoscope 2024 Leo Horoscope
Weekly Horoscope : या राशींना मिळेल भाग्याची साथ तर या राशी येतील अडचणीत, तुमची रास?

जानेवारी : खोळंबलेले आर्थिक व्यवहार मार्गस्थ होतील. आर्थिक बाबतीत चांगले योग, शिक्षण, नातेसंबंध, खरेदी-विक्री या बाबतीत जरा जपून राहावे लागेल. अमावस्येदरम्यान किरकोळ अपघाताचे योग. अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करताना जपावे लागेल. या राशीतील सर्व नक्षत्राच्या व्यक्तींना वर्षभर सतत काही ना काही लाभ विशेषतः वस्त्रलाभ होत राहतील.

फेब्रुवारी : पूर्वी जर काही दैवीकर्म केले असेल, तर त्याचे फळ या महिन्यात मिळेल. मनातील अनेक गोष्टी साध्य होतील. लग्नासाठी प्रयत्न करीत असाल, तर भाग्यवान, देखण्या व्यक्ती आयुष्यात येऊ लागतील. आर्थिक स्थिती सुधारेल. इतकेच नव्हे, तर नवे मार्गही दिसू लागतील. मामा, मावशी, आत्या आणि मित्रमंडळी यांच्याशी काही बाबतीत मतभेद होतील. काही जणांकडून जबरदस्तीने कागदपत्रांवर सह्या घेणे वगैरे प्रकार घडतील.

Annual Horoscope 2024 Leo Horoscope
Mangalvar Upay: या राशी आहेत हनुमंताला प्रिय, मंगळवारी करा हे उपाय, कायम बरसेल कृपा

मार्च : या महिन्यात नको त्या व्यक्ती गाठ पडण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी कोणतेही व्यवहार करू नका, अन्यथा निस्तरताना नाकीनऊ येतील. नोकरी-व्यवसायात स्थिरसावरता मिळेल. घराण्यातील मालमत्तेचे प्रश्‍न सोडविण्यास अनुकूल काळ. अत्यंत अवघड अशी सरकारी कामे या महिन्यात होतील. हाती सतत पैसा खेळत राहील. विद्यार्थ्यांना शिक्षणात उत्तम यश मिळेल. मंगळाचे भ्रमण शुभ आहे. अचानक धनलाभ होऊ शकतील. रक्तदोष, उष्णता विकार आणि पित्त यांचा त्रास जाणवेल. तेलकट पदार्थ कटाक्षाने टाळा.

एप्रिल : प्रगतीचा आलेख वाढत राहील. त्याचा फायदा करून घ्या. उद्योग-व्यवसायात अपेक्षेपेक्षाही चांगले यश मिळेल. आर्थिक समस्यांवर मात कराल. जीवनाला स्थैर्य देणारी एखादी घटना घडेल. अनेक संस्मरणीय घटना या महिन्यात घडू शकतात. कित्येक दिवस न सुटलेल्या समस्या या महिन्यात सुटतील. जीवनात काहीतरी करून दाखविण्याची जिद्द या महिन्यात पूर्ण होईल.

मे : वैवाहिक जीवन, प्रवास, भागीदारी, व्यवसाय याबाबतीत हा महिना विशेष परिणामकारक ठरेल. किरकोळ अपघात, आजार, बाधा वगैरेपासून जपावे. मशिनरीशी संबंध असेल, तर विशेष काळजी घ्यावी. या महिन्यात बदलणाऱ्या ग्रहणामुळे दैनंदिन कामकाजावर बराच परिणाम होईल. जर प्रेम प्रकरणात असाल, तर विवाहासाठी प्रयत्न करण्यास हरकत नाही.

जून : बाहेरची कामे करताना घरगुती सुधारणांकडेही लक्ष द्यावे लागेल. काही जुन्या वस्तूंना चांगला भाव येईल. घरात जर काही अडगळ वगैरे असेल, तर ती विकून टाका, त्याचा चांगला फायदा होईल. घराची दुरुस्ती करताना दागिने किंवा महत्त्वाची कागदपत्रे वगैरे मिळण्याची शक्यता आहे.

जुलै : कलाक्षेत्र व आवडीच्या क्षेत्रात चांगले यश मिळवाल. नातेवाईक व शेजारी यांचे उत्तम सहकार्य मिळेल. या महिन्यात अमावस्या काहीतरी संकेत देऊन जाईल. कुणालाही मदत करताना पूर्ण विचार करूनच करा. घराण्यातील गुप्त गोष्टी बाहेर जाणार नाहीत, याची काळजी घ्या. अचानक एखादी मोठी जबाबदारी पडण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट : गुंतवणूक करण्याचा विचार करा. भाग्योदयाचे नवे पर्व सुरू होईल. संततीच्या बाबतीत चांगले होईल. जरा वादावादी होण्याची शक्यता आहे. नोकरीविषयी आणि आरोग्याच्या बाबतीत बेफिकीर राहू नका. या काळात अति दूरवरचे प्रवास टाळावेत. इतरांच्या चुकांमुळे काही प्रकरणात गुंतण्याचे योग. या महिन्यात रवीचा प्रभाव अधिक जाणवेल. तुमच्या कामाचे स्वरूप पाहून इतर लोक तुमचा हेवा करतील.

Annual Horoscope 2024 Leo Horoscope
Astro Tips : या राशी असलेल्यांचा मेंदू असतो तिक्ष्ण; Computer पेक्षाही अधिक फास्ट असतात हे लोक!

सप्टेंबर : वडिलधाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात, जरा सांभाळून घ्या. नोकरी-व्यवसायात किंवा प्रवासात नव्या ओळखी होतील. भाऊबंदकी अथवा मालमत्तेच्या वाटणीचे काम या महिन्यात सुरू होईल. शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक जबाबदारी पडण्याची शक्यता आहे. किमती वस्तूंची खरेदी होईल.

ऑक्टोबर : योग्य नियोजन केल्यास आर्थिक स्थिती उत्तम राहील. धनप्राप्तीच्या अनेक संधी दिसतील. गेलेली नोकरी परत मिळू शकेल किंवा उच्चपदही मिळू शकते. मादक पदार्थ आणि विषारी द्रव्यांपासून सांभाळावे. अमावस्या काही बाबतीत अनिष्ट आहे. कोणत्या तरी एका मोठ्या प्रकरणात फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. हाती घेतलेल्या कामात किरकोळ अडथळे जाणवतील.

नोव्हेंबर : वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. नवीन वाहन खरेदीचा योग आहे. समुद्र, नद्या, दऱ्या-खोऱ्या अशा ठिकाणी वावरताना काळजी घ्या. जीवावरचे प्रसंग येऊ शकतात. काही जणांना ध्यानीमनी नसताना अचानक लाभ होतील. व्यावसायिक क्षेत्रात असाल, तर चांगले नाव कमवाल.

डिसेंबर : मानसिक आनंद देणाऱ्या घटना, अतिशय महत्त्वाच्या काही घटना या महिन्यात घडतील. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी. मोठमोठे व्यवहार, प्रवास, देणे-घेणे करताना जरा काळजी घ्या. क्षुल्लक गोष्टींची चूकही महागात पडू शकते.

Annual Horoscope 2024 Leo Horoscope
Happy New Year 2024  :  नव्या वर्षात भाग्यवान आहेत या राशी, नशिब पालटणार अन् खिसा होणार धन-धना-धन

सिंह राशीचा स्वामी 'सूर्यनारायण'

सिंह राशीचा स्वामी सूर्यनारायण आहे. सर्वोच्च पद, सरकारी नोकरी, मानसन्मान, दैवी कृपा या बाबीही सूर्यनारायणाच्या कृपेनेच प्राप्त होतात. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कोणतेही काम करताना पूर्व दिशेकडून सुरू केल्यास जीवनात निश्‍चित यश मिळते. सात घोड्यांचा रथ ही कवी कल्पना आहे, प्रत्यक्षात सूर्यकिरणे हे त्याचे घोडे असून तोच त्याचा वेग आहे. त्यामुळे घरात कुठेही सूर्याच्या किरणाला अटकाव होणार नाही, याची काळजी घ्या. यावर्षी धनलाभाचे योग दिसतात. वास्तूमधील काही दोष यावर्षी कमी होऊ लागतील.

वडिलधाऱ्यांच्या बाबतीत असलेल्या चिंताही कमी होतील. राहू-केतूचे भ्रमण शापित दोष निर्माण करणार आहे. जर तुमच्या घराण्यात श्राद्धकर्मे व्यवस्थित होत नसतील, तर पूर्वजांच्या पिडेचा त्रास होऊ शकतो. त्वचा विकारासह काही अनाकलनीय आजारही उद्‌भवतील. संसारी जीवनात कटूता निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. भाग्यस्थानातील हर्षलमुळे ध्यानीमनी नसताना अचानक दूरवरचे प्रवास योग येतील. काही जणांचे भाग्य अचानक उजळेल. चांगली नोकरी मिळणे, अपेक्षा नसतानाही श्रीमंत स्थळ मिळणे, प्रवासात ओळखी होऊन जीवनाला नवी कलाटणी मिळणे, अशाप्रकारे त्याचे अनुभव येऊ शकतात. नेपच्यूनचे भ्रमण शुभ नाही. मादक पदार्थ, व्यसने, सट्टा, जुगार यापासून दूर राहणे चांगले ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.