Koyna Dam : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणक्षेत्रात 'इतक्या' मिलिमीटर पावसाची गरज; पाणीसाठा कमी होणं ठरणार चिंताजनक

'धरणातील पाणीसाठा कमी होणे चिंताजनक असेल.'
Koyna Dam Patan Satara
Koyna Dam Patan Sataraesakal
Updated on
Summary

कोयना धरणातून सिंचन योजनांसाठी ३८ टीएमसी पाणी उपलब्ध केले जाते.

सांगली : कोयना धरणातील (Koyna Dam) पाणीसाठा ६८ टीएमसी आहे. सध्या पाऊस थांबला आहे. धरण शंभर टक्के भरेल का, याबाबत चिंता कायम आहे. अजून या क्षेत्रात ७०० मिलिमीटर पावसाची अपेक्षा आहे.

१५ ऑक्टोबरपर्यंत हा पाऊस अपेक्षित असून त्यानंतर धरण पाणीसाठ्याचे (Water Storage) नियोजन केले जाईल. तोवर सिंचन, वीजनिर्मिती, पिण्याचे पाणी याबाबतच्या धोरणात कोणताही बदल केला जाणार नाही, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.

Koyna Dam Patan Satara
Solapur Politics : 83 वर्षाच्या योद्ध्याची नेत्यांना धास्ती; पवारांच्या 'या' खेळीचा अंदाज कोणालाच लागत नाही, दिग्गजांना चिंता

जिल्ह्यात टंचाईची स्थिती गंभीर बनत चालली आहे. शिराळा तालुक्याचा अपवाद वगळता अन्यत्र पाऊस झालेला नाही. पेरण्या झालेल्या नाहीत. खरीप वाया गेला आहे. या स्थितीत जिल्ह्याची संपूर्ण भिस्त ही सिंचन योजनांवरच आहे. त्यात कोयना धरणावर अवलंबून टेंभू, ताकारी, आरफळ योजना, तर चांदोली धरणावर अवलंबून म्हैसाळ योजना महत्त्वाची आहे.

या योजना सध्या पूर्ण क्षमतेने चालवल्या जात आहेत. त्यासाठी पुरेसा पाणीसाठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोयना धरणातून सिंचन योजनांसाठी ३८ टीएमसी पाणी उपलब्ध केले जाते. आता पावसाळ्यात उपसलेले पाणी त्यात गृहित धरले जाणार का, याबाबत स्पष्टता नाही. परंतु, धरणातील पाणीसाठा कमी होणे चिंताजनक असेल.

Koyna Dam Patan Satara
Road Accident : पोलिस भरतीचं स्वप्न राहिलं कायमचं अधुरं! अपघातात दोन युवकांचा दुर्देवी अंत, एक गंभीर जखमी

कोयना व्यवस्थापन तूर्त याकडे तटस्थपणे पाहत आहे. जी काही धोरणे आखायची, ती १५ ऑक्टोबरनंतर, असे निश्‍चित आहे. कोयना धरणक्षेत्रात आतापर्यंत ४३०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. आणखी ७०० मिलिमीटर पावसाची अपेक्षा आहे. यंदा १०२ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

Koyna Dam Patan Satara
Hasan Mushrif : शरद पवार कोल्हापुरात येताच मुश्रीफांच्या डोळ्यात पाणी; म्हणाले, 'आम्ही पवार साहेबांसोबत नाही याचं दुःख होतंय'

तो किती खरा ठरतो आणि किती फोल, हे महिनाभरात कळेल, मात्र पुढच्या ७०० मिलिमीटरमध्येच सगळे धोरण बदलणार आहे. धरण शंभर टक्के भरले तर शेती, उद्योग, पिण्यासाठीचे पाणी आणि वीजनिर्मिती यासाठीच्या कोट्यात काहीही बदल होणार नाही, मात्र धरण कमी भरले तर मात्र उलटफेर होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.