Shivsena News: ठाकरे गटाला नाशिकमध्ये खिंडार! माजी आमदारांसह नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर

नाशिकमधील खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
Uddhav Thackery News, Shivsena News
Uddhav Thackery News, Shivsena NewsEsakal
Updated on

नाशिकमधील खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नाशिकचे संपर्कप्रमुख असलेल्या भाऊसाहेब चौधरी यांची पक्षातून उचलबांगडी केल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्विट कली आहे. विशेष म्हणजे संजय राऊतांच्या जामीनावर चौधरी यांनी स्वाक्षरी केली होती. दरम्यान आता भाऊसाहेब चौधरी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. (Shivsena News)

संजय राऊत यांच्या खांद्याला खांदा लावून दौऱ्यात सहभागी असलेल्या भाऊसाहेब चौधरी यांनी प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. अशी सर्व परिस्थिती असतांनाच नाशिकमधील माजी मंत्री, माजी आमदार आणि माजी नगरसेवक असे एकूण पाच जण शिंदे गटात जाण्यासाठी तयार आहेत. हिवाळी अधिवेशन दरम्यान हे प्रवेश होण्याची शक्यता आहे. अधिवेशना दरम्यान पक्षप्रवेश रखडला तर नववर्षात हा प्रवेश सोहळा पार पडण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackery News, Shivsena News
Disha Salian : आदित्य ठाकरे अडचणीत? 'त्या' प्रकरणाच्या चौकशीबाबत CM शिंदेंचं सूचक विधान

दरम्यान मागील आठवड्यात ठाकरे गटातील 13 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता, त्यामध्ये ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख आणि ग्रामीण जिल्हाप्रमुख यांनीही शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला गळती सुरू झाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर राज्यात सत्तांतर झाल्यापासून आणि शिवसेनेचे दोन गट पडल्यापासून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.

Uddhav Thackery News, Shivsena News
Maharashtra Politics : ठाकरे गटाला पुन्हा हादरा! संजय राऊतांच्या जामीनदाराचीच हकालपट्टी

मोठ्या प्रमाणावर नेते, आमदार, मंत्री पक्षांतर करताना दिसून येत आहेत. भाजपसोबत जात शिवसेनेच्या शिंदे गटाचे सरकार स्थापन केलं त्यानंतर इतर पक्षातून आणि खासकरून ठाकरे गटातून अनेक नेते पदाधिकारी, आमदार, मंत्री, कार्यकर्ते शिंदे गटात जाताना दिसत आहे. अशातच नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडताना दिसत आहे.

Uddhav Thackery News, Shivsena News
Shivsena: काय होणार? उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे पहिल्यांदाच येणार आमने-सामने!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.