सोलापूर : ‘कौशल्य विकास’चा लाभ राज्यातील युवक-युवतींना लाभ मिळावा यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्याच महाविद्यालयात कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे सुरु केली जाणार असून राज्यातील एक हजार तर सोलापूर जिल्ह्यातील २६ महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण केंद्रे असणार आहेत. महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियानाच्या धर्तीवर आचार्य चाणक्य कौशल्य केंद्रे सुरु केली जात आहेत.