Uddhav Thackeray : 'त्यांना लाज वाटली पाहिजे…'; भाजपच्या केंद्रीय नेत्याचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray Newsesakal
Updated on

मुंबई : उद्धव ठाकरे यांची काल झालेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात चौफेर फटके बाजी केली. उद्धव ठाकरेंनी राज्य तसेच केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिल आहे. कोविडच्या भीतीमुळे जे घराबाहेर बाहेर पडले नाहीत, लोकांनी त्यांनी सत्तेतून घालवलं अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

अनुराग ठाकूर मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते, ते म्हणाले की, अडीच वर्ष जो व्यक्ती आपल्या कार्यकर्त्यांना देखील भेटला नाही. घरातच बंद होऊन बसला. कोविडच्या भयाने घरातून बाहेर पडला नाही. त्याला सत्तेतून घालवण्याचं काम जनतेन केलं. बाळासाहेब ठाकरे ज्या विचारधारेचा विरोध करत त्यांच्यासोबत गेले. हा दिवस तर येणारच होता. आता पश्चताप करून काय उपयोग.

फक्त देशच नाही तर सगळं जग मान्य करतं की कोरोना काळात जगभरातील १६० देशांना भारताने औषधं पुरवली.भारतात २२० कोटी मोफत लस देण्याचं काम मोदी सरकारने केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून फंड देण्यात आला आणि वैज्ञानिकांना प्रेरित करण्यात आलं तेव्हाच लस तयार झाली.

Uddhav Thackeray News
Odisha Train Crash : ओडिसा रेल्वे अपघातप्रकरणात नवा ट्विस्ट? CBIच्या चौकशीनंतर ज्युनिअर इंजीनियर कुटुंबासह बेपत्ता

प्रत्येक घरात जाऊन लस देण्याचं काम मोदी सरकारने केलं. तुम्ही त्यावेळी घाबरून खोलीत बंद होतात. तुम्ही तर मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला विसरून गेला होतात, असा टोला देखील केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी लगावला.

तुम्ही सर्जिकल स्ट्राइकवरून प्रश्न विचारणाऱ्यांशी, जे भारताच्या सैनिकांना १० वर्ष सत्तेत असून बुलटफ्रूफ जॅकेट देऊ शकले नाहीत त्यांच्याशी हातमिळवणी केली असाही टोला लगावला.

त्यांना लाज वाटली पाहीजे...

उद्धव ठाकरे सत्तेत असताना पालघर येथे साधू संतांवर हल्ला झाला होता यावर बोलताना ठाकूर म्हणाली की, त्यांच्या सरकारच्या काळात पालघरमध्ये साधूंवर हल्ला करून त्यांची हत्या झाली याची त्यांना (उद्धव ठाकरे) लाज वाटली पाहिजे, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मुंबईत म्हटले आहे.

Uddhav Thackeray News
Maharashtra Assembly Election : मुंबईवर राज्य कोणाचं? शिंदे गटाची हवा टाईट, ठाकरे गट जिंकणार 'इतक्या' जागा

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली होती. उद्धव ठाकरे म्हणाले की, 'यांच्या डोक्यात कुठून व्हायरस घुसला आहे, काय माहिती. कोविडची लस मोदींनी तयार केली, मग बाकीचे काय गवत उपटत होते का? संशोधक गवत उपटत होते का? असे सगळे अंधभक्त आणि त्यांचे गुरू म्हणल्यानंतर यांना कोणतं व्हॅक्सिन द्यायचं ते ठरवावं लागेल. यांना व्हॅक्सिन देण्याची गरज आहे'. यानंतर भाजपकडून त्यांच्या या वक्तव्यावरून प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

Uddhav Thackeray News
Weather Update : राज्यात मान्सून कधी सक्रीय होणार? मुंबईत 'या' दिवशी बरसणार पाऊस; हवामान खात्याने दिली माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.