Apmc Election Result: अजित पवारांना धक्का! पुण्यात बंडखोरांकडून राष्ट्रवादीला 'दे धक्का'

शेतकरी विकास पॅनेलची बाजी; १८ पैकी १३ जागांवर वर्चस्व
ajit pawar get angry over spreding wrong news politics
ajit pawar get angry over spreding wrong news politicsesakal
Updated on

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तब्बल २० वर्षांनंतर पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलचा राष्ट्रवादीच्या बंडखोरांनी भाजपच्या मदतीने अक्षरश: धुव्वा उडविला. सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलने १८ पैकी १३ जागांवर विजय मिळवित वर्चस्व निर्माण केले.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल आणि भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलने एकमेकांसमोर शड्डू ठोकला होता.

ajit pawar get angry over spreding wrong news politics
Apmc Election Result: गद्दार आमदारांचा शेतकऱ्यांनी करेक्ट कार्यक्रम केला; ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया

दिग्गजांना पराभवाचा धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत पॅनेलची घोषणा केल्यानंतर जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विकास दांगट यांना विरोधी पॅनेलला मदत करत असल्याचे कारण देत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले होते.

पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर दांगट यांनी सर्वपक्षीय पॅनेलसाठी सर्व ताकद पणाला लावली होती. त्यांना भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांची साथ मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीतील बंडखोरांनी भाजपच्या मदतीने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला. यात अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला.

राष्ट्रवादीच्या पॅनेलचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले तर, भाजप पुरस्कृत पॅनेलचे नेतृत्व जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट आणि भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष रोहिदास उंद्रे यांनी केले होते.

‘हमाल-मापाडी’तून नांगरे अव्वल

हमाल-मापाडी मतदारसंघाचा निकाल सर्वप्रथम जाहीर झाला. यात संतोष नांगरे यांनी विजयाची शिट्टी वाजवली. त्यांना सर्वाधिक ८८८ मते मिळाली. त्यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी पाठिंबा जाहीर केलेल्या राजेंद्र चोरघे यांचा पराभव केला.

ajit pawar get angry over spreding wrong news politics
Maharashtra Din : महाराष्ट्रातील अद्भूत असं ठिकाण, म्हणतात परशुरामांनी याची निर्मिती केली, एकदा बघाच

ग्रामपंचायत मतदारसंघात समसमान

ग्रामपंचायत मतदारसंघातील चार जागांवर दोन्ही पॅनेलमधील प्रत्येकी दोन उमेदवार विजयी झाले. या मतदारसंघातून अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलचे रामकृष्ण सातव (वाघोली) हे सर्वाधिक ४०५ मते घेऊन विजयी झाले. तर, अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे सुदर्शन चौधरी (सोरतापवाडी) २५६ मते घेऊन विजयी झाले. ग्रामपंचायत मतदारसंघात सहकार पॅनेलचे नानासाहेब आबनावे (चंदननगर-खराडी) हे ३०७ मतांनी विजयी झाले आहेत.

‘सेवा सोसायटी’वर शेतकरी विकासचे वर्चस्व

सेवा सहकारी सोसायटी गटावर भाजप पुरस्कृत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे वर्चस्व राहिले. माजी सभापती रोहिदास उंद्रे यांना या मतदारसंघातून सर्वाधिक १ हजार ३२ मते मिळाली. माजी सभापती दिलीप काळभोर यांना ८०५, प्रशांत काळभोर यांना ८८०, राजाराम कांचन यांना ८५४, प्रकाश जगताप यांना ९३९, नितीन दांगट यांना १ हजार १९, दत्तात्रेय पायगुडे यांना ८३० मते मिळून हे या मतदारसंघातून विजयी झाले आहे.

तर, इतर मागास प्रवर्गातून शशिकांत गायकवाड हे ८६० मते मिळवून विजयी झाले. भटक्या जाती-विमुक्त जमाती गटातून लक्ष्मण केसकर ८७९ मते घेत विजयी झाले. महिला राखीव मतदारसंघातून मनीषा हरपळे या १ हजार ७६ मते मिळवून विजयी झाल्या. तर सारिका हरगुडे या ८६८ मते घेऊन निवडून आल्या. हरगुडे यांनी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांच्या पत्नी सरला यांचा पराभव केला.

अडते, व्यापारी गटात विक्रमी मतांनी विजय

अडते व्यापारी मतदारसंघातील दोन जागांवर जय शारदा गजानन पॅनेलचे गणेश घुले आणि अनिरुद्ध भोसले विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. घुले यांना ५ हजार ८५२ एवढी तर भोसले यांना ५ हजार ८१६ मते मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.