Maharashtra Bhushan Award 2023 : डॉ. धर्माधिकारी यांना आज ‘महाराष्ट्रभूषण’

लाखो श्री सदस्य खारघरमध्ये दाखल
appasaheb dharmadhikari Maharashtra Bhushan 2023 Award ceremony today kharghar navi mumbai
appasaheb dharmadhikari Maharashtra Bhushan 2023 Award ceremony today kharghar navi mumbaiSakal
Updated on

खारघर : ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. अाप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्रभूषण’ सन्मानाने उद्या (ता. १६) गौरविले जाणार आहे. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा होणार आहे.

सकाळी साडेदहाच्या सुमारास हा सोहळा होणार आहे. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातील लाखो श्री सदस्य खारघरमध्ये दाखल झाले आहेत. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत.

बैठक चळवळीचे प्रणेते दिवंगत महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांनी दासबोधाच्या निरूपणातून समाजमनात आमूलाग्र बदल केले आहेत. समाजातील अंधव्यवस्थेवर दासबोधी विचारांच्या माध्यमातून जनजागृती करत समाजाला सकारात्मक वाटेवर घेऊन जाण्याचे काम या चळवळीतून झाले आहे.

नानासाहेब धर्माधिकारी यांची समाजपरिवर्तनाची ही धुरा त्यांचे सुपुत्र अाप्पासाहेब धर्माधिकारी यांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे खारघरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्रभूषण पुरस्कारासाठी आठवड्याभरापासून श्री सदस्यांकडून श्रमदान केले जात आहे. यामागे प्रत्येक काम हे देशासाठी, स्वधर्मासाठी करत असल्याची भावना श्री सदस्यांमधून व्यक्त केली जात आहे.

खारघर शहराचे रुपडे पालटले

खारघरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येने श्री सदस्य येणार असल्याने सिडको, पनवेल, नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सतर्क राहावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या.

त्यामुळे पालिका प्रशासनाने खारघरमधील मुख्य रस्ते, चौक, सेंट्रल पार्क परिसरातील रस्त्यांवरील बंद पथदिवे तातडीने सुरू केले आहेत. तसेच मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. याशिवाय खारघर कार्पोरट पार्कसाठी राखीव असलेल्या जागेवरील कचरादेखील हटवण्यात आल्याने खारघर शहराचे रूपडेच पालटले आहे.

रस्त्या-रस्त्यांवर रांगोळी

खारघरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यात काही महिलांनी उन्हाची पर्वा न करता, मैदानाच्या सभोवती असलेले रस्ते, चौक, सर्कल अशा विविध ठिकाणी रांगोळी साकारली आहे; तर रविवार परिसरातील गावातील महिला मुलीकडून रांगोळी साकारून या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

हेलिकॉप्टरद्वारे होणार पुष्पवृष्टी

पद्मश्री डॉ. अाप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यादरम्यान अाप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

स्थळ - आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदान, खारघर

वेळ- सकाळी १०.३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.