Pradhan Mantri Fasal Bima Yojana
मुंबई : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, दुष्काळ अशा संकटांमुळे शेतकऱ्यांचं हातचं पीक जातं. त्यामुळे २०१६पासून केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना सुरु केली. रब्बी हंगामासाठी पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेण्याचं आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे. (Pik Vima Yojana 2022)
असं मिळेल संरक्षण
पीक विमा योजनेमध्ये कर्जदार, बिगर कर्जदार, भाडेपट्टीवर शेती करणारे सर्व शेतकरी सहभागी होऊ शकतात. यामध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळणार आहे. राज्य शासनाने निर्धारित केलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाई मिळणार आहे. चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी नोंदवले गेल्यास नुकसान भरपाई मिळेल. हवामानातील बदलांमुळे पिकांचं होणारं नुकसान, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान; या बाबींचा यामध्ये समावेश आहे.
हे ही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...
हप्ता आणि सहभाग प्रक्रिया
विमा संरक्षित रक्कमेच्या १.५ टक्के हप्ता शेतकऱ्यांना भरावयाचा आहे. तर नगदी व व्यापारी पिकांसाठी ५ टक्के हप्ता भरावयाचा आहे. यामध्ये शेतकऱ्यांसह राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा शेअर असणार आहे.
बँक आणि सीएससी केंद्रांमध्ये विमा प्रस्वात सादर करता येणार आहेत. विमा भरण्यासाठी अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२२ (रब्बी ज्वारी) तर गहू, हरभरा, कांदा यासाठी १५ डिसेंबर अंतिम मुदत आहे. यासह उन्हाळी भात, उन्हाळी भूईमूग यासाठी ३१ मार्च २०२३ अंतिम मुदत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.