Nasim Khan : मुस्लीम समाजाला मागालसेपणानुसार पाच टक्के आरक्षण लागू करा

अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या मागासलेपणानुसार त्यांना पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
Nasim Khan
Nasim KhanSakal
Updated on

मुंबई - अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या मागासलेपणानुसार त्यांना पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ साली मुस्लीम समाजाला मागासलेपणानुसार ५ टक्के आरक्षण दिले होते. परंतु नंतरच्या भाजप-शिवसेना सरकारने हे आरक्षण कायम ठेवले नाही.

हे आरक्षण सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लीम समाजाला देण्यात आले होते. आपण मागील ९ वर्षांपासून या मागणीसाठी पाठपुरावा करत आहोत.

मुस्लीम समाजात ५० घटक आहेत, याचा सर्वंकष विचार करुन मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी विनंती नसीम खान यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत तपासणी करुन योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्याचे नसीम खान यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.