Anil Parab : पेपरफुटीविरुद्ध दक्षता कक्ष नेमा!;ॲड. अनिल परब यांची ‘मविआ’च्या बैठकीत मागणी

व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश आणि सरकारी नोकरभरती परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांना पायबंद बसावा तसेच या प्रकरणांचा तपास जलदगतीने होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वतंत्रपणे विशेष दक्षता आणि तपास कक्ष स्थापन करावा, अशी मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवार ॲड. अनिल परब यांनी केली आहे.
Anil Parab
Anil Parab sakal
Updated on

मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश आणि सरकारी नोकरभरती परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांना पायबंद बसावा तसेच या प्रकरणांचा तपास जलदगतीने होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वतंत्रपणे विशेष दक्षता आणि तपास कक्ष स्थापन करावा, अशी मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवार ॲड. अनिल परब यांनी केली आहे.

विधानपरिषद निवडणुकीच्या तयारी सदंर्भात रविवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची चेंबूर येथे झालेल्या बैठकीत त्यांनी ही मागणी केली. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा व उत्तर-मध्य मुंबईच्या खासदार प्रा. वर्षा गायकवाड यावेळी उपस्थित होत्या. विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक महाविकास आघाडी एकत्रपणे लढवत आहे. मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक अशा दोन जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लढवत आहे. तर कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक अशा दोन जागा काँग्रेस लढवत आहे.

‘‘वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थी आणि पदवीधरांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात आले आहे. वैद्यकीयची नीट, प्राध्यापकासाठीची नेट, महसूल विभागाची तलाठी, पीएचडीची सीईटी, इयत्ता १२ वी बोर्ड आदी परीक्षांचे पेपर फुटत आहेत. पदवीधरांचे प्रतिनिधी असलेल्या विधान परिषदेच्या आमदारांसमोरचा हा ज्वलंत विषय असावा. दक्षता कक्ष स्थापन करून त्याचे संयोजन आयपीएस अधिकाऱ्याकडे दिल्यास याला आळा बसेल,’’ असा दावा त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.