Jitendra Awhad: शरद पवार अध्यक्ष मान्य मग त्यांची कारवाई का नाही?; आव्हाडांनी वाचून दाखवले नियम

अजित पवार गटानं पत्रकार परिषद घेत महत्वाच्या नियुक्त्यांची घोषणा केली होती.
Jitendra Awhad bodyguard Death Case
Jitendra Awhad bodyguard Death CaseEsakal
Updated on

मुंबई : अजित पवार गटानं पत्रकार परिषद घेत महत्वाच्या नियुक्त्यांची घोषणा केली होती. पण या नियुक्त्यांना कायदेशीर संविधानिक मान्यता नाही, असा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. हा दावा करताना आव्हाडांनी संविधानानुसार निवडणूक आयोगानं घालून दिलेले राजकीय पक्षाचे नियम काय आहेत, ते वाचूनच दाखवले.

Jitendra Awhad bodyguard Death Case
Team Ajit Pawar: अजित पवारांची नवी टीम तयार; नियुक्त्यांचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडं सुपूर्द

आव्हाड म्हणाले, राष्ट्रवादी एकच पक्ष आहे. त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत. हे त्या किटी पार्टीत बसलेल्या सगळ्यांनी मान्य केलं आहे. निवडणूक आयोगानं मान्यता दिलेल्या पक्षाच्या संविधाननुसार पक्षाध्यक्षांना अधिकार दिले आहेत. अध्यक्षाला कोणत्याही पक्ष, समिती सदस्यांना बडतर्फ करण्याची कारवाई करण्याचे अधिकार आहेत.

Jitendra Awhad bodyguard Death Case
Jitendra Awhad: विरोधीपक्ष नेतेपदी आव्हाडांची नेमणूक वैध की अवैध? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

पक्षाला धोका असेल तर त्यासाठी शिस्तभंग समितीकडे प्रस्ताव पाठवला पाहिजे. हा अध्यक्ष अधिकार आहे. शरद पवारांचं कारवाईचं पत्र प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांना पक्षातून निलंबित केलं आहे. तुम्हाला कायदेशीर अधिकार नाही. नेमणूक करण्याचे तिथं सगळे म्हणतात शरद पवार अध्यक्ष आहेत मग त्यांची कारवाई तुम्हाला का मान्य नाही? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

Jitendra Awhad bodyguard Death Case
Rupali Chakankar Update : रुपाली चाकणकर कोणाच्या बाजूनं? राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत झालं स्पष्ट

पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर केलेली कारवाई मान्य करणार की नाही? शरद पवार अध्यक्ष मान्य मग त्यांनी केलेली कारवाई का मान्य नाही? जयंत पाटील अधिकार आहे कारवाई करण्याचे. कायद्याच्या अज्ञानापोटी त्यांनी केलेली नियुक्तीला अर्थ नाही. तुम्ही म्हणता शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. अजित दादांनीही हे मान्य केलं तसेच सगळ्यांनी मान्य केले मग राहिले काय?

Jitendra Awhad bodyguard Death Case
NCP Action: प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यावरील कारवाईला वेग; सुळेंनी पवारांना लिहिलं पत्र

पक्ष सांगण्याचा त्यांना अधिकार नाही

विधी मंडळ पक्ष वेगळा आणि राजकीय पक्ष वेगळा. नियुक्त्यांबाबत फक्त राजकीय पक्ष निर्णय घेतो, विधीमंडळ हा पक्ष नाही. हे कोर्टानं शिवसेना निकालात स्पष्ट केलं आहे. त्यांनी अध्यक्ष निर्णयवर आक्षेप घेतला असून एकनाथ शिंदेंची केलेली नेमणूक अवैध ठरलवली आहे, हे सुप्रीम कोर्ट म्हणत आहे.

विधानसभेतील एक गट बाहेर जातो तो पक्ष आहे सांगतो त्याला तो अधिकार नाही. पक्ष पवार साहेबांकडं आहे. कोर्टाच्या निकालानुसार पक्ष कोणाचा आहे तर शरद पवारांचा. नऊ जणांची अपात्रता मान्य करावी लागेल. उरलेल्यांना पण संधी आहे पवार साहेबांना फोन करून सांगायचं आम्ही तुमच्या बरोबर आहोत. त्यांना अपात्रतेचा अधिकार नाही, ते व्हीप नेमू शकत नाहीत.

लोक थोबाडीत मारतील

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला काळे फासलं. यावर प्रतिक्रया देताना आव्हाड म्हणाले, जोडे मारा, माझ्या तोंडाला काळं फासा पण नंतर लोक कुणाच्या थोबाडीत मरतील ते कळेल. तुमच्याकडं फक्त भाजपची वाट आहे, तोच पर्याय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.