सोलापूर : तीन वर्षांपासून रखडलेल्या पोलिस भरतीची अनेकदा घोषणा झाली. पण, आता ११ हजार ४४३ (गट-क) पोलिसांची पदे भरली जाणार आहेत. ऑक्टोबरअखेरीस भरतीची प्रक्रिया सुरु होऊ शकते. पोलिस भरतीवेळी पहिल्यांदा मैदानी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला असून त्याची लवकरच गृह विभागाकडून घोषणा होईल.
ग्रामीण भागातील तरूण लेखीच्या तुलनेत मैदानी परीक्षेत चांगले गुण घेतात. त्यामुळे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलिस भरतीच्या निकषांत ऐतिहासिक बदल केला. सुरवातीला लेखीऐवजी मैदानी आणि मुलाखत बंद, असे निर्णय घेतले. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक मुला-मुलींना नोकरीची संधी मिळाली. पण, काही वर्षांपूर्वी त्यात पुन्हा बदल झाला आणि सुरवातीला लेखी परीक्षा घेतली गेली. आता त्यात पुन्हा बदल करण्याचा निर्णय झाला असून पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीत गोळाफेक, धावणे या बाबींचा समावेश आहे. राज्यभरातील चार ते सहा लाख तरूण पोलिस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. ऑक्टोबरअखेरीस पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होऊन नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष भरती होईल, असे महासंचालक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. त्यात पोलिस शिपाई, चालक, सशस्त्र पोलिस शिपाई अशी पदे आहेत.
लाचखोरीत पोलिसांचा दुसरा क्रमांक
पोलिस अंमलदार, अधिकाऱ्यांची जवळपास २२ ते ४० हजारांपर्यंत रिक्त आहेत. मनुष्यबळाअभावी नवीन पोलिस ठाणी, पोलिस चौक्यांचा निर्णय प्रलंबित आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामांचा ताण वाढला आहे. दुसरीकडे लाचखोरी देखील या विभागात वाढली असून महसूल विभागानंतर पोलिस विभाग लाचखोरीत राज्यात अव्वल आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस भरतीची मोठी गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
आवश्यक कागदपत्रे...
- दहावी, बारावीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र
- महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल)
- शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला
- आधार कार्ड, जात प्रमाणपत्र
- नॉन क्रिमीलेयर, लग्न झाले असल्यास नावाचे गॅझेट कॉपी (विवाहीत स्त्री)
- चालक पदासाठी हलके वाहन चालवण्याचा टीआर परवाना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.