शिवसेना विधीमंडळ पक्षनेतेपदी अजय चौधरींच्या नियुक्तीला मंजुरी

Approval of appointment of Ajay Chaudhary as Shiv Sena Legislative Party Leader
Approval of appointment of Ajay Chaudhary as Shiv Sena Legislative Party LeaderApproval of appointment of Ajay Chaudhary as Shiv Sena Legislative Party Leader
Updated on

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेचे आमदार अजय चौधरी (Ajay Chaudhary) यांची राज्य विधानसभेतील शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी (Legislative Party Leader) नियुक्ती करण्याच्या शिवसेनेच्या प्रस्तावाला महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींनी मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील पत्र उपसभापती कार्यालयाकडून शिवसेनेच्या कार्यालयीन चिटणीसांना पाठवण्यात आले आहे. (Approval of appointment of Ajay Chaudhary as Shiv Sena Legislative Party Leader)

संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने आपणास असे कळविण्याचे निर्देश आहेत की, उक्त पत्राद्वारे करण्यात आलेली अजय चौधरी, विधानसभा सदस्य यांची शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी (Legislative Party Leader) केलेल्या निवडीस मान्यता देण्याची विनंती उपाध्यक्ष (कार्यकारी अध्यक्ष), महाराष्ट्र विधानसभा यांनी मान्य केली आहे, असे उपसभापती कार्यालयाकडून शिवसेनेच्या कार्यालयीन चिटणीसांना पाठवण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Approval of appointment of Ajay Chaudhary as Shiv Sena Legislative Party Leader
एनडीएच्या उमेदवार मुर्मू यांनी गांधी, पवार, बॅनर्जींना मागितला पाठिंबा

शिवसेनेचे (Shiv sena)नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारला आहे. शिवसेनेच्या बैठकीत हजर राहण्यास सांगितल्यानंतरही ते व काही आमदार हजर झाले नाही. बंड पुकारल्यानंतर त्यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. तसेच आमदार अजय चौधरी (Ajay Chaudhary) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. आता त्यांच्या नियुक्तीला विधानसभेच्या उपसभापतींनी मंजुरी दिली आहे.

Approval of appointment of Ajay Chaudhary as Shiv Sena Legislative Party Leader
उदयनराजे भोसले म्हणाले, ‘माविआ’चे हे अनैसर्गिक गठबंधन होतं...

अजय चौधरी हे कट्टर शिवसैनिक

अजय चौधरी हे शिवसेनेचे शिवडी विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. २०१९ मध्ये विधानसभा मतदारसंघातून अजय चौधरी विजयी झाले होते. अजय चौधरी हे कट्टर शिवसैनिक आहेत.

शिंदेच गटनेते असल्याचा शिंदे गटाने केला होता दावा

बंड केल्यानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या गटनेते पदावरून उचलबांगडी करीत शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. यावर आक्षेप घेत एकनाथ शिंदेच गटनेते असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. अशातच शिवसेना विधीमंडळ गटनेतापदी अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनील प्रभू यांना विधीमंडळाने मान्यता दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.