River Linking Project : महत्वाकांक्षी वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता ; पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण करून या भागातील शेतीला समृद्ध करणाऱ्या महत्वाकांक्षी वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्पास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
River Linking Project
River Linking Projectsakal
Updated on

मुंबई : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण करून या भागातील शेतीला समृद्ध करणाऱ्या महत्वाकांक्षी वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्पास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ८७ हजार ३४२ कोटी ८६ लाख रुपयांच्या या प्रकल्पामुळे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार असून विशेषत: मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागाला मोठा फायदा होणार आहे.

या प्रकल्पामुळे गोदावरीच्या उपखोऱ्यातून वैनगंगेतील पाणी बुलडाणा जिल्ह्यातील वैनगंगा प्रकल्पात आणण्यात येईल. यासाठी एकूण ४२६.५२ कि.मी.चे जोड कालवे बांधण्यात येतील. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातील १५ तालुक्यांना सिंचन तसेच पिण्याचे पाणी आणि औद्योगिक कारणासाठी याचा उपयोग होईल.

रब्बी हंगामात पाण्याचा वापर करता यावा म्हणून ३१ साठवण तलाव देखील बांधण्यात येणार आहेत. केंद्रीय जल आयोगाने देखील यास मान्यता दिली असून हा प्रकल्प एकात्मिक राज्य जलआराखड्यात समाविष्ट करण्यात आला आहे.

लहान शहरांतील पायाभूत सुविधांना वेग देण्यासाठी कर्ज स्वरुपात निधी उपलब्ध करून देण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली.

मंत्रिमंडळाचे इतर महत्वाचे निर्णय

  • स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर येत्या ९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येणार

  • प्रकल्पबाधितांच्या सदनिकांसाठी मिठागरांची जमीन उपलब्ध करून देणार

  • आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षेसाठी दोन वर्षे मुदतवाढ

  • अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होणार

  • अल्पसंख्याकांचे मागासलेपण दूर करण्यासाठी अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेस मान्यता

  • कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय. आजरा तालुक्यात योग व निसर्गोपचार महाविद्यालय

  • मुंबई उच्च न्यायालयातून सेवानिवृत्त होणाऱ्या न्यायाधीशांना घरकामगार, वाहनचालक सेवा देणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.