राज्यातील 22 लाख शेतकऱ्यांना वीजेची अंदाजे बिलं! दहा ते 50 हजार भरण्याची अट

महाराष्ट्रासाठी दररोज सरासरी 25 हजार मेगावॅट एवढी वीज लागते. राज्यात कृषीपंपाचे 44 लाख 61 हजार 585 ग्राहक असून त्यापैकी 51 टक्‍के ग्राहकांकडे मीटर नसल्याची बाब समोर आली आहे. त्या शेतकऱ्यांना सर्वांसोबत सरसकट वीज बिल भरावे लागत असल्यानेच थकबाकीत वाढ झाल्याची माहिती महावितरणमधील विश्‍वसनिय सूत्रांनी दिली.
FARMER
FARMERESAKAL
Updated on

सोलापूर : महाराष्ट्रासाठी दररोज सरासरी 25 हजार मेगावॅट एवढी वीज लागते. राज्यात कृषीपंपाचे 44 लाख 61 हजार 585 ग्राहक असून त्यापैकी 51 टक्‍के ग्राहकांकडे मीटर नसल्याची बाब समोर आली आहे. त्या शेतकऱ्यांना सर्वांसोबत सरसकट वीज बिल भरावे लागत असल्यानेच थकबाकीत वाढ झाल्याची माहिती महावितरणमधील विश्‍वसनिय सूत्रांनी दिली. 2015 पूर्वीच्या कनेक्‍शनधारकांकडे मीटर नसल्याने त्यांच्या सबस्टेशनवरील वीजेचा निर्देशांक निश्‍चित करून शेतकऱ्यांना सरसकट समान वीज बिले दिली जातात, असेही सांगण्यात आले.

FARMER
थकबाकीदार शेतकऱ्यांना बॅंकांकडून नोटीस! आता 'सिबील'वर पीक कर्ज

कर्नाटकात शेतकऱ्यांना वीज मोफत असून पंजाबमधील नव्या सरकारच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना आता तीनशे युनिटपर्यंत वीज मोफत मिळणार आहे. पण, कृषीप्रधान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अन्य राज्यांच्या तुलनेत प्रतियुनिट अंदाजित 40 ते 60 पैसे अधिक दर आकारला जातो. विद्युत नियामक आयोगाच्या माध्यमातून वीजेचा दर निश्‍चित केला जातो. त्यानंतर राज्य सरकारकडून मिळणारी सवलत ग्राह्य धरून शेतकऱ्यांचा वीजेचा दर निश्‍चित केला जातो. पण, राज्यात कोळसा खाणी कमी असून परराज्यातून तथा ऑस्ट्रेलियासह इतर देशातून कोळसा खरेदी, वीज निर्मितीची केंद्रे विदर्भ, मराठवाड्यात अन्‌ मागणी पश्‍चिम महाराष्ट्रात जास्त असल्याने पारेषणचा खर्च अधिक असल्याने वीजेचा दर अधिक असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात शेतीपंपानुसार वीजेचे दर वेगवेगळे असून मीटर नसलेल्या शेतीपंपाला (तीन एचपी) दरमहा 228 रुपये, पाच एचपीसाठी दरमहा 244 रुपये, साडेसात एचपीसाठी 260 रुपये आणि दहा एचपीसाठी दरमहा 306 रुपयांचे बिल सरसकट भरावे लागते. त्यामुळे तेवढी वीज वापरलेली नसतानाही इतरांप्रमाणे का बिल भरायचे, अशी मानसिकता शेतकऱ्यांची झाली आहे. सध्या राज्यात महावितरणीची कृषीपंपाकडील थकबाकी जवळपास 40 हजार कोटींपर्यंत आहे. तरीही, कृषीपंप धोरणाअंतर्गत सप्टेंबर 2020 पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या 35 टक्‍के रक्‍कम भरल्यास संपूर्ण थकबाकी माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. परंतु, चुकीच्या बिलांमुळे शेतकरी थकबाकी भरायला तयार नाही. थकबाकी न भरणाऱ्यांचे कनेक्‍शन तोडणी अद्याप सुरुच असून मागील वर्षभरात जवळपास दीड लाख ग्राहकांचे वीज कनेक्‍शन तोडल्याचेही सूत्रांनी सांगितले.

FARMER
पुन्हा खोटेच आश्‍वासन! हप्ते पाडण्याचा आदेश नसल्याने शेतीपंपाचे वीज कनेक्‍शन तोडणी सुरुच

राज्यातील वीजेचे दर अन्य राज्यांच्या तुलनेने खूप आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळत नाही. त्यावर महाविकास आघाडी सरकार सकारात्मक निर्णय घेऊन काही दिवसांत तोडगा काढेल.
- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र कॉंग्रेस

FARMER
आमदार प्रणिती म्हणाल्या, योगी, महाराज राजकारणात आल्यानेच देशाचे वाटोळे

वीजेचे सध्याचे दर
मीटर असलेल्या ग्राहकांसाठी
प्रतियुनिट
1.75 रुपये
मीटर नसलेल्यांसाठी दरमहा
प्रतिएचपी
228 ते 306 रुपये

FARMER
सोलापूर : नाना पटोले यांनी चिमुकलीसाठी आपले हेलिकॉप्टर देऊन केली मदत

कनेक्‍शन तोडणी टाळण्यासाठी...
कृषीपंपाचे वीज कनेक्‍शन तोडणी थांबविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या विद्युतपंपाच्या पॉवरनुसार टार्गेट देण्यात आले आहे. त्यानुसार तीन एचपीचा विद्युतपंप असलेल्यांनी दहा हजार 260 रुपये, पाच एचपी मोटार असलेल्यांनी 18 हजार 300 रुपये, साडेसात एचपी मोटार असलेल्यांनी 29 हजार 250 रुपये आणि दहा एचपीचा विद्युत पंप असलेल्यांनी 45 हजार 900 रुपये भरुन वीज कनेक्‍शन तोडणी थांबवावी, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.