Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत येण्यास सेलिब्रिटी घाबरतात? फडणवीसांनी दिलं पटोलेंना उत्तर

भाजपच्या भीतीमुळं सेलिब्रेटी भारत जोडो यात्रेत सहभागी होत नाहीएत असा आरोप नाना पटोले यांनी केला होता.
Devendra Fadnavis on Nana patole
Devendra Fadnavis on Nana patoleDevendra Fadnavis on Nana patole
Updated on

मुंबई : भारत जोडो यात्रेत सिलिब्रेटिंना सहभागी व्हायचंय पण भाजपच्या भीतीमुळं त्यांना सहभागी होता येत नाहीए, असा असा आरोप नाना पटोले यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (are celebrities afraid to come to Bharat Jodo Yatra Devendra Fadnavis replied to Nana Patole alligations)

Devendra Fadnavis on Nana patole
सध्या मराठा आरक्षणाऐवजी EWS...; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर फडणवीस नक्की काय म्हणाले?

फडणवीस म्हणाले, "नाना पटोले आमचे मित्र आहेत ते सकाळपासून रात्रीपर्यंत आरोपच करत असतात. त्यांचे आरोप बिनबुडाचे असतात, त्यांच्या आरोपांना थोडीच उत्तर द्यायचं असतं. ज्याला ज्याला या यात्रेस सामील व्हायचंय त्यांनी व्हावं. ही भारत जोडो यात्रा नाही तर मोदी हटावं यात्रा आहे. देशाला मोदींचं जे नेतृ्त्व आहे त्यामुळं समान्यांमध्ये विश्वास निर्माण होत आहे, त्यामुळं भाजपत सारखेच लोक येत आहेत"

Devendra Fadnavis on Nana patole
EWS Reservation : "एकत्र यावंच लागेल"; बाबासाहेबांची आठवण काढत राऊतांचा आरक्षणाला विरोध

राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रात आलेली आहे ती सुखरुप बाहेर जाईल याची काळजी आम्ही घेऊ. त्यांचे कार्यक्रम कायदेशीररित्या योग्य प्रकारे पार पडले पाहिजेत याची व्यवस्थाही आम्ही पाहू. ही भारत जोडो नाही तर विरोधकांना जोडो यात्रा आहे. कितीही यात्रा निघाल्या तरी त्यामुळं भाजपला काहीही फरक पडणार नाही, अशा शब्दांत फडणवीसांनी काँग्रेसच्या आरोपांना उत्तर दिलं.

अनेक पक्षांना भीती वाटायला लागलीए - फडणवीस

उद्धव ठाकरे यांच्या मध्यावधी निवडणुका लागण्याच्या शक्यतेवर फडणवीस म्हणाले, अनेक पक्षांना आता भीती वाटायला लागलं आहे की, कदाचित आपले आमदार आपल्या पक्षात टिकणार नाही ते दुसऱ्या पक्षात जातील त्यमुळं या वावड्या उठवल्या जात आहेत. पण शिंदे-फडणवीस सरकार मजबूत आहे, सरकारला काहीही होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.