Shivsena Symbol Row : "शिवसेनेतील फूट म्हणजे..." ; ठाकरे गटाच्या वकीलांचा महत्वाचा युक्तिवाद

Shivsena Symbol Row
Shivsena Symbol Row
Updated on

नवी दिल्ली : शिवसेनेवर कोणाचा दावा आहे, धनुष्यबाण कुणाला मिळणार याबाबत आज महत्वाची सुनावणी पार पडली. शिवसेनेच्या दोन गटांतील वादावर आज निवडणूक आयोगात सुनावणी झाली. यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गटाने आपली बाजू मांडली. याबाबत पुढील सुनावणी शुक्रवारी २० जानेवारीला होणार आहे.  (Shivsena Symbol Row)

यापूर्वी १० जानेवारी रोजी निवडणूक आयोगात सुनावणी झाली तेव्हा एकनाथ शिंदे यांचे वकील महेश जेठमलानी यांनी २०१८ मध्ये शिवसेनेची घटना ज्या पद्धतीने बदलण्यात आली ती बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद केला होता. एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमत असल्याचे शिंदे गटाच्या वतीने सांगण्यात आले. तर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी देखील जोरदार युक्तिवाद केला होता. 

कपिल सिब्बल यांचा महत्वाचा युक्तिवाद -

दरम्यान आजच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली. शिवसेनेतला कोणताही गट नाही तर कपोकल्पित आहे. शिवसेनेतील फूट म्हणजे कल्पना आहे. शिवसेनेत दाखवलेल्या फुटीला काहीही अस्तित्व नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी शिवसेना आहे. शिवसेनतील फुट आयोगाने ग्राह्य धरु नये, असे कपिल सिब्बल म्हणाले.  

Shivsena Symbol Row
J P Nadda : नड्डाांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवला; भाजप कार्यकारिणीत प्रस्ताव मंजूर

शिंदे गटाने दाखल केलेल्या कागदपत्रे बोगस आहेत. या कागपत्रांमध्ये त्रुटी आहेत. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयापर्यंत प्रतिक्षा करा, अशी विनंती कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला केली. तसेच काही लोकांनी पक्षातून बाहेर पडणे हे बेकायदेशीर असल्याचे सिब्बल म्हणाले. 

Shivsena Symbol Row
Udayanraje Bhosale : महाराष्ट्र केसरी शिवराजच्या भेटीनंतर उदयनराजे म्हणाले, खेळात राजकारण...

...तर ओळख परेड करा-

शिंदे गटाचे कागपत्र खरे असतील तर ओळख परेड करा, अशी महत्वाची मागणी कपिल सिब्बल यांनी केली. लोकप्रतिनिधी आणि पक्ष वेगळा आहे. आमदार, खासदार पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे आधी कोर्टाचा निर्णय येऊ द्या, असे कपिल सिब्बल आयोगात म्हणाले.

Shivsena Symbol Row
Satyajeet Tambe : विविध शिक्षक संघटनांचा सत्यजीत तांबे यांना पाठिंबा

पक्षात होता तेव्हा आक्षेप का घेतला नाही. पक्षाचा लाभ घेतला आणि पतर लोकशाही नाही, असे म्हणता. पक्षाच्या धोरणांना समजून मतदार मतादान करत असतात. सर्व आमदार, खासदार शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आले आहेत, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

Shivsena Symbol Row
Shiv Sena Symbol : काय आहे धनुष्यबाणाचा वाद? 10 मुद्द्यांमध्ये समजून घ्या

आतापर्यंत उमेदवारांना एबी फॉर्म दिला जात होता. मग आता आक्षेप का?. तसेच पक्षाअंतर्गत निवडणुका घेण्यास मुदतवाढ द्या, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांची २३ जानेवारीला पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आहे.

Shivsena Symbol Row
Eknath Khadse : खडसे नॉटरिचेबल असल्याच्या निव्वळ अफवाच; खरं कारण आलं समोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.