शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यापासून शिवसेनेत रोज नव्या घडामोडी घडत आहेत.
मुंबई : महाराष्ट्रामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. काल (शुक्रवार) रात्री या दोघांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीमध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, असं असतानाच आता शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यापासून शिवसेनेत रोज नव्या घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशानं सद्या शिवसेनेत अनेक नवीन घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळतंय. अनेक आमदारांनी आपला वेगळा गट केल्यामुळं शिवसेनेत (Shivsena) नव्या नेत्यांना संधी देण्याचं काम चालू आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आलीय. अशी माहिती एका पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आलीय. त्याचबरोबर विजय नाहटा आणि विजय चौगुले यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं माहिती पत्रकात देण्यात आलीय. त्यामुळं येणाऱ्या काळात शिवसेनेत अनेक नेत्यांची वरिष्ठ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.