'मातोश्री'हून अद्याप फोन नाही; शिंदे गटासमीप गेलेल्या खोतकर यांचं विधान

Abdul Sattar, Arjun Khotkar
Abdul Sattar, Arjun Khotkar
Updated on

औरंगाबाद - ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात आलेले शिवसेनेचे गटनेते आणि माजीमंत्री अर्जुन खोतकर नुकतेच दिल्लीहून परतले. खोतकर लवकरच शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून त्यांनी आज शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्यासोबत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्याला मातोश्रीमधून कोणताही फोन आला नसल्याचं स्पष्ट केलं. (Arjun Khotkar news in marathi)

Abdul Sattar, Arjun Khotkar
एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाचे अध्यक्ष होणार का? रामदास कदम म्हणतात...

औरंगाबाद विमानतळावर खोतकर बोलत होते. ते म्हणाले की, मी जालन्याला गेल्यानंतर भूमिका स्पष्ट करणार आहे. दिल्लीला पदरात काही पाडून घेण्यासाठी गेलो नव्हतो. मित्राला भेटलो. त्यांना सांगितलं की, मला बाय देऊन टाका. एवढे दिवसं तुम्ही उपभोगलं थोड आम्हाला उपभोगू द्या, असं अर्जुन खोतकर यांनी नमूद केलं. पुढील निर्णय़ उद्या ठरवणार आहेत. मात्र माझ्याशी आणखी मातोश्रीहून संपर्क होऊ शकला नाही, असही खोतकर यांनी नमूद केलं.

Abdul Sattar, Arjun Khotkar
दिल्लीत शिंदे यांना केवळ नमस्कार, मी शिवसेनेचाच; अर्जुन खोतकर

खोतकर म्हणाले की, रावसाहेब दानवेंनी सांगितलच, राजकारणात कोणीही शत्रु किंवा मित्र नसतो. आम्ही काय काठ्या घेऊन भांडण करायचं का, असा प्रश्न खोतकर यांनी केला. लोकसभा लढवणार का, आणि कोणाकडून लढणार असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर खोतकर म्हणाले की, मी शिवसेनेकडूनच लढणार आहे. मात्र त्यांनी शेवटपर्यंत एकनाथ शिंदे गटात जाणार का, याविषयी स्पष्ट काहीही सांगितलं नाही.

यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले की, परवा सिल्लोडमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात अर्जुन खोतकर आमच्या व्यासपीठावर राहतील. खोतकर ईडी, किंवा सीबीआयला घाबरत नाहीत. मात्र खोतकर आमच्यासोबत येणार हे निश्चित असल्याचं सत्तार यांनी नमूद केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()