छत्रपती शिवरायांचा लौकिक आणखी वाढणार! ऐतिहासिक विजयदुर्गात होणार 'आरमारी म्युझियम'; 'इतक्या' कोटींचा निधी मंजूर

राजा भोज याने किल्ले विजयदुर्ग बांधला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तो विस्तारला.
Chhatrapati Shivaji Maharaj Vijaydurg
Chhatrapati Shivaji Maharaj Vijaydurgesakal
Updated on
Summary

शिवरायांच्या आरमारी केंद्राची ओळख म्हणून विजयदुर्गला ‘आरमारी म्युझियम’ होत आहे.

देवगड : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या आरमाराची ओळख आणि पर्यायाने यातून होणारी संभाव्य पर्यटन वृद्धी यासाठी सिंधुरत्न समितीच्या माध्यमातून ऐतिहासिक विजयदुर्ग (Vijaydurg) येथे ‘आरमारी म्युझियम’ साकारणार आहे. यासाठी शासनाची दोन एकर जागा मिळाली आहे. सुमारे साडेचार कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजुरी आहे.

लवकरच निविदा प्रक्रिया होईल, अशी माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी जामसंडे येथे दिली. संग्रहालय कसे असावे, यासाठी अभ्यासकांच्या पथकाने काम सुरू केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, संतोष किंजवडेकर आणि महेश खोत उपस्थित होते.

Chhatrapati Shivaji Maharaj Vijaydurg
कलाशिक्षकानं पिंपळाच्या पानांवर रेखाटला शिवरायांचा जीवनपट; महाराजांच्या भावमुद्रांनी जिंकली मनं

जठार म्हणाले, ‘राजा भोज याने किल्ले विजयदुर्ग बांधला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तो विस्तारला. विजयदुर्ग येथे छत्रपती शिवरायांची आरमारी गोदी होती. त्यामुळे ऐतिहासिक विजयदुर्गला ‘आरमारी म्युझियम’ करण्याचे ‘सिंधुरत्न समिती’च्या माध्यमातून प्रस्तावित केले होते.

आपल्यासह समितीचे अध्यक्ष शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा पाठपुरावा तसेच आमदार नीतेश राणे यांचे सहकार्य यातून याला मंजुरी मिळाली. विजयदुर्गला बांधकाम विभागाची सुमारे दोन एकर जागा यासाठी उपलब्ध झाली असून, सुमारे साडेचार कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. आवश्यक वाटल्यास मंत्री गिरीश महाजन यांनी आणखी निधी देण्याचे मान्य केले आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Vijaydurg
OBC समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या; उदयनराजेंचं PM मोदींना साकडं

म्युझियम परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबरच कान्होजी आंग्रे, मायनाक भंडारी आदींचे पुतळे, जहाजांच्या प्रतिकृती तसेच अन्य माहिती देणाऱ्‍या बाबी साकारण्यात येतील. यासाठी रघुजी आंग्रे आणि जे. जे. आर्ट स्कूलमधील अभ्यासक कामाला लागले आहेत. विजयदुर्ग हेलियमचे पाळणाघर असल्याने लेझर शो, ब्रह्मांडाची माहिती तसेच या आरमार म्युझियममुळे पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल. यातून स्थानिक पर्यटन वाढून आर्थिक उलाढाल होण्यास मदत होईल."

इतिहासप्रेमींनी आवाहन

शिवरायांच्या आरमारी केंद्राची ओळख म्हणून विजयदुर्गला ‘आरमारी म्युझियम’ होत आहे. त्यामुळे ऐतिहासिक काळातील दस्तऐवज किंवा काही साहित्य कोणाकडे असल्यास सिंधुरत्न समितीशी संपर्क साधावा. त्यामुळे म्युझियममध्ये त्याची मांडणी करण्यास हातभार लागू शकेल. इतिहासप्रेमींनी संपर्क साधण्याचे आवाहन प्रमोद जठार यांनी केले आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Vijaydurg
तोडगा न काढल्यास उदयनराजेंच्या नेतृत्वात पुणे-बंगळूर महामार्गाचं काम बंद पाडू; माजी आमदाराचा स्पष्ट इशारा

पर्यटक संख्येत वाढ

अलीकडेच मालवण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन गेल्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला आणि राजकोट येथील पर्यटकांची संख्या वाढली आहे. आरमारी म्युझियममुळे गोवा, मालवणकडे येणारा पर्यटक विजयदुर्गला येईल. यातून स्थानिक उलाढाल होण्यास मदत होईल, असे जठार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.