Mumbai: मुंबईमध्ये २ जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाने दिल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. यासंदर्भातील खरी बातमी समोर येत नव्हती. त्यामुळे अनेकजण गोंधळून गेले. यासंदर्भातील स्पष्टता आता समोर आलेली आहे.
मुंबईचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ही अफवा असल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, मुंबईमध्ये कलम १४४ प्रमाणे जमावबंदी आदेश असल्याच्या बातम्या फिरत आहेत. परंतु त्यात तथ्य नाही. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अवैध मार्गाने मोर्चे आंदोलने करणाऱ्यांसाठी कलम ३७ (१) अन्वये पोलिसांकडून आदेश काढले जातात. हे आदेश दर पंधरा दिवसाला निघतात. सामान्यांच्या दैनंदिन जीवनावर याचा काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे जमावबंदीचे आदेश निघालेले नाहीत. असं स्पष्टीकरण नांगरे पाटलांनी दिलं.
हेही वाचाः वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून
काल मुंबईत जमावबंदीचे आदेश निघाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. २ जानेवारीपर्यंत हे आदेश असल्याचं त्यात सांगण्यात आलं होतं. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मेळावे घेण्यास मनाई, फटाके फोडणे, लाऊडस्पिकर वाजणे, वाद्ये वाजणे यावर बंदी, घोषणाबाजीवर निर्बंध; असं नमूद करण्यात आलेलं. परंतु असे कोणतेही आदेश नसल्याचं आता मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.
हेही वाचा: Swasthyam 2022: तुम्ही का अस्वस्थ होता, हे समजण्याचा सोपा मार्ग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.