सॅमने NCBला २५ लाख रुपये दिले होते - सुनिल पाटील

सॅमने NCBला २५ लाख रुपये दिले होते - सुनिल पाटील
Updated on
Summary

ड्रग्ज केस आणि आर्यन खान प्रकरणाचा मास्टर माइंड सुनिल पाटील असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला होता. याबाबत सुनिल पाटीलने खुलासा करताना काही खळबळजनक गौप्यस्फोटही केले आहेत.

ड्रग्ज केस आणि आर्यन खान प्रकरणाचा मास्टर माइंड सुनिल पाटील असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला होता. याबाबत सुनिल पाटीलने खुलासा करताना काही खळबळजनक गौप्यस्फोटही केले आहेत. सुनिल पाटीलने एएनआयला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितलं की, माझ्याकडे टीप आल्याचं म्हटलं गेलं पण माझ्याकडे टीप आलीच नाही. ती मनिष भानुशाली आणि नीरज यादव यांच्याकडे आला होता. मला यांनी एनसीबीशी संपर्क करण्यास सांगितलं होतं. मी केला नाही, माझ्याकडे त्यांच्यातल्या कोणाचाही संपर्क नव्हता.

सॅम माझा एक वर्षापासून मित्र होता. सॅम आणि सॅनव्हिल डिसूझा एकच व्यक्ती आहे. त्याचं चार महिन्यापूर्वी काहीतरी झालेलं. त्यासंदर्भात २५ लाख एनसीबीला देऊन तो सुटला होता. त्यावेळी त्याने माझ्याकडे पैसे मागितले होते. त्याचा एनसीबीशी संपर्क असल्याचं माहिती होतं. त्यामुळे किरण गोसावी आणि मनिष भानुषालीला सॅमचा संपर्क दिला. एवढीच माझी भूमिका आहे.

क्रूज ड्रग्जबद्दल कसं समजलं असं विचारलं असता सुनिल पाटीलने सांगितलं की, तुम्ही काम करता का असं विचारण्यात आलं होतं, मनिष भानुशालीला फोन आला की तुला काम करायचं आहे आणि सुनिलशी बोलून घ्या. पण माझा एनसीबीमध्ये कोणाशी संपर्क नव्हता. चार महिन्यांपूर्वी सॅमचे प्रकरण मला माहिती होते. त्यामुळे मी सॅमचा नंबर किरण गोसावी, मनिष भानुशालीला दिला.

सॅमने NCBला २५ लाख रुपये दिले होते - सुनिल पाटील
NCB नं आजचं चौकशीसाठी बोलावलं; पण आर्यनं जाणार नाही, कारण....

पन्नास लाख घेतले आणि तुम्ही परत दिले असंही म्हटलं जातंय याबद्दल विचारले असता सुनिल पाटील म्हणाला की, सॅम, मनिष, किरण गोसावीसह चार जण तेव्हा एनसीबीच्या कार्यालयाबाहेरच फिरत होते. त्यांचे लोकेशन काढा. मी एक तारखेला अहमदाबादमध्ये होते. चार तारखेपर्यंत तिथेच होतो. एनसीबीची कारवाई झाली तेव्हा रात्री अडीच वाजता किरण गोसावीने सेल्फी पाठवला की, हा शाहरुखचा मुलगा. त्यावेळी मला त्यांच्यात काय डील सुरुय माहिती नव्हतं. फोटो पाठवल्यानंतर मला माहिती झालं. त्यांच्यात कुठं डील झाली हे माहिती नाही. न्यूज चॅनेलवरून मला समजलं.

सॅमने मला फोन करून सांगितलं की ५० लाखांचे टोकन दिले आहे. प्रभाकर साईलला द्यायचे आहे. किरणने नंबर दिला आणि प्रभाकर साईलसोबतचे चॅटिंगसुद्धा आहे. त्याला सांगितलेल्या ठिकाणी पैसे पोहोचवले आणि साईलला दिले. त्यानंतर पुन्हा दोन वाजता मला पुन्हा सॅमचा फोन आला, काम झालं नाही आणि पूजा पैसे मागत आहे. तेव्हा मी किरणशी बोलून पैसे काढून घेत, प्रभाकर साईलला सांगितले की काम झालं नाही आणि पैसे परत द्यायचे आहेत अशी माहितीसुद्धा सुनिल पाटीलने दिली.

मी आधीच आर्थिक अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीत पुन्हा कोणत्या गोष्टीत अडकायचे नाहीय. मला त्रास होऊ नये आणि हे प्रकरण वादग्रस्त आहे. त्यामुळे यात मी जास्त भाग घेतला नाही. नंतर साईलने स्टेटमेंट दिलं. तेव्हा मला दिल्लीला बोलावण्यात आलं. तिथं मारहाण झाली, माझा जीव वाचवून मी अहमदाबादला आलो असं सुनिल पाटीलने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.