Sharad Pawar: "शरद पवारांच्या स्क्रीप्टप्रमाणे शिवसेना पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वळसनीला बांधला"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर
NCP leader Mohammad Faizal disqualification from Lok Sabha revoked political news
NCP leader Mohammad Faizal disqualification from Lok Sabha revoked political news sakal
Updated on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर आहेत. अयोध्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यादरम्यान पाप करणारेच रामलल्लाच्या दर्शनाला जात आहेत अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती.

खासदार संजय राऊत यांच्या या टीकेला शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी खोचक उत्तर दिलं आहे. नरेश म्हस्के यांनी, दररोज सकाळी वाजणारा भोंगा असं म्हणत राऊत यांच्यावर टीका केली आहे. तर राऊत यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष केवळ खुर्ची करता शरद पवार यांच्या स्क्रीप्ट प्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वळसनीला बांधला असे म्हटलं आहे. तर राऊत यांच्यामुळे आम्हाला हिंदुहृदयसम्राट सम्राट म्हणताना जीभ जड व्हायची. आम्हाला जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणावं लागत होतं अशीही टीका केली आहे.

NCP leader Mohammad Faizal disqualification from Lok Sabha revoked political news
...त्यामुळे महिला शूर्पणखा दिसतात; केंद्रीयमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानाचं महिला मंत्र्याकडून समर्थन

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांसह अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. ते अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. हा फक्त शिवसेनेचा अयोध्या दौरा असल्याचं सांगितलं जात होतं. मुख्यमंत्री शिंदे येणार म्हणून अयोध्यामध्ये मोठी तयारी करण्यात आली आहे. जागोजागी पोस्टर लावण्यात आले आहेत. या दौऱ्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.

NCP leader Mohammad Faizal disqualification from Lok Sabha revoked political news
Devendra Fadnavis: अचानक ठरलं! उपमुख्यमंत्री भाजप मंत्र्यांसोबत अयोध्येला, दौऱ्यामागे राजकीय खेळी?

दोन दिवसापर्यंत अयोध्येचा दौरा केवळ शिवसेनेचा असल्याचं सांगितलं जात होतं. भाजपचे नेते या दौऱ्यात सामील होणार असल्याचं शिवसेनेच्या कोणत्याच नेत्यांनी सांगितलं नव्हतं. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रभू रामाचं दर्शन घेण्याची इच्छा होती. त्यामुळेच आम्ही अयोध्येला जात असल्याचं सांगण्यात आलं. विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी पक्षावर या दौऱ्यावरून टीका करताना दिसून येत आहेत.

NCP leader Mohammad Faizal disqualification from Lok Sabha revoked political news
कर्नाटकात काँग्रेसला बसणार धक्का? 15 नेते जेडीएसमध्ये सामील होणार; माजी मुख्यमंत्र्यांचा दावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.