सध्या राजकीय वर्तुळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याने एकच चर्चा रंगली. या वक्तव्यावर अनेकांनी सडकून टीका केली यात शिवसेना प्रमुख यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर निषेध व्यक्त करत राज्यपालांना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची वेळ आली आहे असे म्हणत हल्लाबोल केलाय. (as Shivsena Leader Uddhav Thackeray said kolhapuri chappal have much longer history)
उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रातील चांगल्या गोष्टी राज्यपालांनी पाहिल्या असतील. महाराष्ट्र का घी देखा, पण कोल्हापूरका जोडा नही देखा. कोल्हापुरी वहान जगप्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ काय लावायचा तो लावा. मी त्यावर बोलणार नाही. पण महाराष्ट्रातील कष्टकरी लोकांनी तो तयार केला आहे. कोल्हापुरी जोड्याचा उपयोग कसा करेल, त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. घी देखा लेकीन कोल्हापुरी जोडा नही देखा असं जर असेल तर त्यांना कोल्हापुरी जोडे सुद्धा दाखवण्याची वेळ आली आहे”
पण खरंच उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे कोल्हापुरी जोड्यामागे खूप मोठा इतिहास दडलाय, तुम्हाला तो इतिहास माहिती आहे का?
कोल्हापुरी चपलेचा इतिहास
आज कोल्हापुरी चप्पल जगप्रसिद्ध आहे. गेल्या ७०० वर्षांपासून हि कोल्हापुरी चप्पल वापरली जाते. असं म्हणतात. इतिहासात राजे महाराजे ही चप्पल वापरायचे तेव्हा या चपलेचे वजन तब्बल २ किलोपर्यंत असायचे. ही कोल्हापुरी चप्पल तयार करण्यासाठी म्हैस व बैलांच्या कातड्याचा वापर त्या वेळेस केला जायचा.
कोल्हापुरी चपलेचा इतिहास तेराव्या शतकाशी जोडला गेला आहे. या चपलेला राजे महाराजांनी पहिल्यांदा वापरलं होत. इतिहासकारांच्या मतानुसार कोल्हापुरी चप्पल अठराव्या शतकात बाजारात विक्रीसाठी आली.
कोल्हापुरी चपलेला आधुनिक काळासोबत बदल दिसून आले. पांडुरंग पाखरे नावाच्या व्यक्तीने या चपलेला कोल्हापुरातून मुंबईत आणले आणि मुंबईकरांना या चपलेची ओळख करून दिली, अशी इतिहासात नोंद आहे.
या शिवाय १९२०नमध्ये कोल्हापूरातील सौदागर परिवाराने या चपलेला आकर्षक असं रूप दिलं आणि वजनही कमी केलं. नंतर सौदागर परिवाराने या नवीन कोल्हापूरी चपलेला मुंबईतील प्रसिद्ध जे जे अँड सन्स या चप्पल दुकानात विक्रीसाठी ठेवले नंतर वाढती या चपलेची मागणी पाहता सौदागर कुटूंब आजूबाजूच्या लोकांना सुद्धा कोल्हापुरी तयार करायला शिकवू लागले. ही चप्पल कोल्हापुरात तयार होते म्हणून ही चप्पल कोल्हापुरी चप्पल या नावाने ओळखली जाऊ लागली आणि आज ती जगप्रसिद्ध आहे.
कारागीर ही चप्पल तयार करताना अशा प्रकारे करतात की तिला कुठल्याही वयोगटातील व्यक्ती अगदी सहजपणे वापरू शकतो. ही चपल तुम्ही कोणत्याही ड्रेस कोडवर सहज वापरू शकतात.
या चपलेची आणखी वैशिष्ट्य म्हणजे याने शरीराला सुद्धा बराच फायदा होतो. उन्हाळ्यात ही चप्पल तुमच्या पायांना गारवा देण्याचं काम करते तसेच हिचे हलके रंग डोळ्यांना त्रास देत नाहीत आणि वजनाला हलकी असल्याने ही चप्पल पायांनासुद्धा आरामदायी ठरते.
आज कोल्हापूरसह जिल्ह्यात असे अनेक कुटुंबं आहेत जे त्यांचा उदर्निवाह हा कोल्हापुरी चपलेतून करतात.जगप्रसिद्ध असलेली हि चप्पल अनेकांच्या रोजगाराचं साधन आहे.
महाराष्ट्र राज्यात तयार होत असलेली ही चप्पल कपाशी, पायतान, बक्कलनाली किंवा पुकारी अशा प्रकारच्या नावाने ओळखली जाते.ही चप्पल आज फक्त आपल्या देशातच नाही तर विदेशात सुद्धा तेवढीच प्रसिद्ध आहे. वेस्टर्न कपड्यांवर सुद्धा ही कोल्हापुरी चप्पल आवडीने घातली जाते. जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेसारख्या देशातसुद्धा या चपलेला मोठी मागणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.