Uddhav Thackeray : सभागृहात सर्वसामान्यांचे प्रश्न येताच संभ्रम निर्माण केला जातो; ठाकरेंची टीका

uddhav thackeray
uddhav thackeray
Updated on

नवी दिल्ली - कसबा पोटनिवडणुकीत भाजपचाला धुळ चारणारे काँग्रेस उमेदवाद रवींद्र धंगेकर यांनी आज मातोश्रीवर जावून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

uddhav thackeray
Arvind Kejriwal : सिसोदियांच्या अटकेच्या निषेधार्थ केजरीवालांची ध्यानधारणा; 'आप'ची मोदींवर टीका

उद्धव ठाकरे म्हणाले की, अधिवेशन सुरू आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. जनतेच्या हिताचे प्रश्न ऐरणीवर येऊच दिले जात नाही. ते प्रश्न समोर येताना दिसताच, त्यावेळी वेगळे वाद सुरू केले जाते. मुंबई-दिल्लीमध्ये कसा फोग येतो, तसे वाद समोर आणले जातात. त्यातून जनतेच्या जीवन-मरणाचे प्रश्न टाळले जातात.

uddhav thackeray
Devendra Fadanvis : पुण्यातील 'त्या' अघोरी प्रकाराची विधीमंडळात चर्चा; फडणवीसांनी दिली माहिती

दरम्यान अवकाळी पाऊस महाराष्ट्रात होतो. त्याला टाळू शकत नाही. पण अशा वेळेला नुकसान झालेल्यांना आधार देणं गरजेचं आहे. शेतकरी अन्नदाता आहे. राजकारण्यांनी स्वार्थी विचार तरी करावा. पंचनाम्याचे आदेश देऊन काही होत नाही. आदेश दिल्यानंतर आपली यंत्रणा शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचते की नाही हे पाहायला हवं.अहवाल आले की नाही, याची खातरजमा करवून निकषाच्या पुढे जावून मदत करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

uddhav thackeray
Unseasonal Rain: अवकाळी पाऊस, गारपीटीमुळं किती नुकसान झालंय? फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती

मी पण आता अधिवेशनात जाणार आहे. धंगेकर यांचं अभिनंदन. पुढील निवडणुका एकत्र लढणार आहोत. मी विधीमंडळात जावून सभागृहात जाणार आहे. सभागृहात बोलण्याची गरज असेल तर नक्कीच बोलणार, असंही ठाकरे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()