Abhijeet Patil: राजीनामा मागे घेतल्यानंतर शरद पवार पुन्हा अॅक्टिव्ह झाले आहेत. गेल्या दोन दिवसात शरद पवार सोलापुर दौऱ्यावर होते.
सोलापूर दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी पंढरपूरात भाषण केलं, ज्याची सध्या चर्चा होते आहे आणि यामागचं कारण ठरले ते म्हणजे अभिजीत पाटील. ज्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत कार्यक्रमात राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि पवारांनी थेट भाषणातच पाटलांना आमदारकीचं तिकीट देऊन टाकलं. (Latest Marathi News)
एकेकाळी अभिजीत पाटालांनी शरद पवारांना चॅलेंज केलं होतं. ते भाजपच्या अनेक नेत्यांसोबत असतात. त्यामूळे त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामूळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
याच प्रवेशानंतर आणि शरद पवारांनी जाहीर केलेल्या आमदारकीच्या तिकीटानंतर सोलापूरातील साखर सम्राट म्हंटले जाणारे अभिजीत पाटील चांगलेच चर्चेत आले. दरम्यान अभिजीत पाटील यांना शरद पवारांनी त्यांना थेट आमदारकी देण्यामागचं काय कारण आहे याचे अनेक तर्क वितर्क राज्याच्या राजकारणात लावले जात आहेत.
कोण आहेत अभिजीत पाटील?
अभिजीत पाटील यांचं मूळ गावं पंढरपुरातील देगाव. शिक्षित अभिजीत पाटील सुरूवातीला ऊस वाहतूकीचे ठेकेदार होते आणि त्यानंतर वाळूच्या ठेकेदारीचं काम सुरु केलं. या दरम्यान सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे होते. अभिजीत पाटलांविरूद्ध अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे मुंडेंच्या बेधक कारवाईमुळे पाटलांना ३ महिने जेलमध्येही जावं लागलं होतं.
अभिजीत पाटलांनी ३ महिने जेलची हवा खाल्यानंतर त्यांनी आपला व्यवसाय बदलला आणि साखर उद्योगाकडे वळाले. २०१७ मध्ये धाराशिव अर्थात त्यावेळच्या उस्माबादमधील धाराशिव कारखाना घेतला. २०१८ मध्ये धाराशिव कारखान्याचं नांदेड यूनिट घेतलं.
२०२० मध्ये नाशिकचा वसंतदादा साखर कारखाना भाडे तत्वावर चालवायला घेतला. अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या सांगोला येथील कारखाना अवघ्या 35 दिवसात सुरु करुन त्यांनी साडेतीन लाख टन उसाचे गाळप करुन बिलाचे वाटप केलं.
त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे २०२१ मध्ये वर्ष १२ वर्ष बंद पडलेला सांगोला साखर कारखाना चालवायला घेतला. अभिजीत पाटील यामुळे पुन्हा चर्चेत आले. ते २०२२ मध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीवेळी.
कारण विठ्ठल साखर कारखाण्यावर गेली जवळपास २० वर्षे राष्ट्रवादीच्या भालके घराण्याची सत्ता होती. मात्र अभिजीत पाटलांनी त्यांच्या याच सत्तेला सुरुंग लावत विठ्ठल सहकारी साखर कारखाना आपल्या ताब्यात घेतला. या निवडणूकीत पाटलांनी थेट शरद पवारांना चॅलेंज केलं होत.
एवढंच, नाही या निवडणूकीच पाटलांना फडणवीसांचा पाठिंबा असल्याची चर्चा होती. कारण अभिजीत पाटील यांचे भाजपच्या अनेकांशी जवळचे संबध आहेत. पण हेच पाटील अनेकदा शरद पवारांच्या गाडीतून प्रवास करताना देखील पहायला मिळाले होते.
यानंतर गेल्या वर्षी अभिजीत पाटील पुन्हा चर्चंत आले ते ईडीच्या धाडसत्रामुळे. कारण अनेक बड्या नेत्यांना एक साखर कारखाना सांभाळताना नाकी नऊ येतात. पण पठ्ठ्यानं पाच वर्षात पाच साखर कारखाना चालवायला घेतले.
त्यामूळे ईडीच्या संशयाची सुई पाटलांवर गेली. त्यावेळी भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी पाटलांची भेट घेतली होती. त्यामुळे पाटील हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरु झाली होती.
मात्र, काल अचानक अभिजीत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि शरद पवारांनी लगेच त्यांना आमदारकी देऊन टाकली. आता पाटलांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यामागचं कारण म्हणजे पंढपुरात भाजपची सत्ता आहे.
समाधान अवताडे विद्यमान आमदार आहेत आणि पुढच्या निवडणूकीतही भाजप त्यांनाच संधी देणार असल्याचं स्पष्ट केलं आणि साखर सम्राट असलेल्या अभिजीत पाटलांना आता आमदारकी लढवायची आहे. सोलापूरात राष्ट्रवादीचा चांगला जम आहे. त्यामुळे पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
आता अभिजीत पाटलांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीला देखील तितकाच फायदा आहे. कारण काही वर्षाच त्यांनी उभा केलेला साखर व्यवसाय अनेकांना जमत नाही. पण अभिजीत पाटलांच्या पक्षप्रवेशामुळे पंढपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा असणारे भालके नाराज आहेत.
कारण आमदारकीसाठी पवारांना अभिजीत पाटलांचं नाव डिक्लेर केल्यामुळं भालकेंचं आमदारकीचं तिकीट कापलं गेल आहे. त्यामुळे पंढरपूरातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धूसपुस वाढली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.