Aurangzeb : ओवैसींच्या सभेत औरंगजेबाच्या घोषणा; वातावरण तापल्यानंतर माध्यमांशी बोलणं टाळलं

या घोषणेमुळे बुलढाण्यात वातावरण तापलं आहे.
Asaduddin Owaisi
Asaduddin OwaisiSakal
Updated on

बुलढाणा : एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची काल बुलढाणा येथे सभा झाली. यावेळी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्यामुळे मोठा तणाव पसरला असून येथील सालीपुरा भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर औवेसी यांनी यासंदर्भात माध्यमांशी चर्चा करण्यासाठी नकार दिला आहे.

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील सालीपुरा भागात ओवैसी यांची सभा पार पडली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी भर सभेत स्टेजजवळ येत "जब तक सूरज चाँद रहेगा, औरंगजेब तेरा नाम रहेंगा" अशा घोषणा दिल्या. यावेळी ओवैसी यांना "हा, हा, रहेंगा रहेंगा" असं म्हणत त्यांना शांत केलं.

Asaduddin Owaisi
Aurangzeb Controversy : धक्कादायक! ओवैसींच्या सभेत पुन्हा औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; पोलीस तैनात

तर ही सभा संपल्यानंतरही मुस्लीम कार्यकर्त्यांनी या भागात घोषणा दिल्या. या प्रकरणाचा व्हिडिओ मध्यरात्री सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोन समाजात तणाव पसरू नये यासाठी पोलिसांनी सदर भागात मोठा फौजफाटा तैनात केला. तर सदर व्हिडिओची चाचपणी पोलिसांकडून सुरू आहे.

"सदर व्हिडिओमध्ये दिलेल्या घोषणा काय आहेत याची सध्या तपासणी सुरू आहे. याची पूर्ण तपासणी झाल्यानंतर सदर आरोपीवर कायदेशीर कारवाई केली जाईल" अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तर शांतता आणि सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Asaduddin Owaisi
Mumbai Rain Video : मुंबईत पावसाचं थैमान; महिला वाहून जाता जाता वाचली; थरारक दृश्ये कॅमेऱ्यात कैद

दरम्यान, याआधी जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, अकोला येथे औरंगजेबाचे फोटो स्टेटसला ठेवण्यावरून दोन समाजामध्ये तणाव पसरला होता. तर कोल्हापूर शहरात दंगल झाली होती. यामुळे कोल्हापूर शहरातील इंटरनेट सुविधा दोन दिवसांसाठी बंद करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.