Asaduddin Owaisi : प्रकाश आंबेडकरांच्या ठाकरे गटासोबतच्या युतीवर ओवेसी म्हणाले, त्यांनी...

Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi
Updated on

नाशिक - ठाकरे गटाची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी, हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असं चित्र मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये एकत्र येण्यासंदर्भात बोलणी झाली आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील माहिती दिली. या युतीवर आता प्रतिक्रिया येत असून प्रकाश आंबेडकर यांचे जुने साथीदार आणि एमआयएमचे प्रमुख असुद्दीने ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ( Asaduddin Owaisi news in Marathi)

Asaduddin Owaisi
Nitesh Rane: लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे..नितेश राणेंचा अजित पवारांवर पलटवार

ओवेसी महाराष्ट्रातील नाशिक येथे आले असता ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर ठाकरे गटासोबत का गेले हे आपल्याला माहित नाही. मात्र आंबेडकरांचा तो निर्णय आहे. तेच सांगू शकतात की उद्धव ठाकरेंसोबत का गेले. आम्ही त्यांच्या सोबत होतो. मी कालही त्यांचा सन्मान करत होतो. आजही करतो.

दरम्यान आमचा प्रयत्न हाच होता की, वंचित समाजाला भारताच्या राजकारणात स्थान मिळावं. वंचित घटकांचे राजकीय पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत सामाजिक, आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या सुटणार नाही. मात्र ते आता ठाकरेंसोबत गेले आहेत. त्यावर आता आपण काय बोलणार, असंही ओवेसी यांनी म्हटलं.

Asaduddin Owaisi
Free TV : मोफत रेशननंतर आता तुमचा टीव्ही पाहण्याचाही खर्च उचलणार केंद्र सरकार!

शिवसेना जेवढ्या जागा सोडेल तेवढ्या जागा लढवू अस प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. महापालिका निवडणुक शिवसेनेसोबत लढण्याचा निर्णय झालाय, मात्र शिवसेनेचा हा प्रयत्न आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षाना देखील सोबत घेतलं पाहिजे त्यावर आम्ही म्हणालो आमचा त्याला विरोध नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.