Asaduddin Owaisi : लव जिहाद कायदा सिद्ध कसे करणार? ओवेसींचा सवाल

Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisiesakal
Updated on

जुने नाशिक : देशाच्या संविधानाने प्रत्येकास आपल्या आवडीनुसार जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे. कोणी कोणाशी विवाह करावा. हा त्यांचा अधिकार आहे. त्यानुसार त्यांना विवाह करु दिला पाहिजे.

कुणी कुणावर प्रेम करत असेल तर याचा तुम्हाला त्रास कशाला हवा. असे परखड मत एमआयएम (MIM) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी व्यक्त केले. गुरुवारी (ता. 5) एका खाजगी कामानिमित्त शहरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शहरातील वडाळा नाका येथील एका हॉटेलमध्ये ते मुक्कामी होते. सकाळी परतीच्या मार्गावर असताना पत्रकारांशी केलेल्या चर्चेत त्यांनी विविध प्रश्नांवर मत मांडले. राज्यात लव जिहाद कायदा संदर्भात मोर्चे निघतायेत यावर त्यांनी बोलताना सांगितले. जेथे जेथे भाजप सरकार आहे त्याठिकाणी जातीपातीचे राजकारण करण्यात येऊन बेकायदेशीर रित्या लव जिहाद कायदा करण्यात आला आहे.

Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi : हे कोणतं प्रेम… म्हणत ओवैसींची पाकिस्तानात न खेळणाऱ्या BCCI वर टीका

लव्ह जिहादचा बाऊ करणाऱ्या भाजपमध्ये अशी किती लोक आहेत की त्यांनी अशाप्रकारचे लग्न केले आहे. कुणी प्रेम करत असेल तर त्याला करू द्या, तुम्हाला त्याचा का त्रास होतोय. प्रत्येक प्रश्नात जातिवाद करणे सोडा. आपल्याकडे महागाई, बेरोजगारी असे एक ना अनेक प्रश्न आहे. त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. धर्म परिवर्तन संदर्भात बोलायचे झाले तर पूर्वीपासूनच देशात धर्म परिवर्तन कायदा आहे. लव जिहाद कायदा तुम्ही सिद्ध कसे करणार. आणखी नवीन कायद्याची आवश्यकता नाही.

भाजप काळात अल्पसंख्यांक समाज आणि गरीब वर्ग सर्वाधिक त्रस्त आहे. खूप असे प्रश्न आहेत की ते सोडविणे आवश्यक आहे. त्याकडे लक्ष देण्याचे काम सरकारने करावे. असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, औरंगजेब यांच्याबाबत श्री. बावनकुळे यांनी राष्ट्रवादी आणि भाजप यांना विचारणा करावी. तसेच अजित पवार यांच्या संदर्भात त्यांनी बोलणे टाळले.

Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi : 'इन्शाअल्लाह, हिजाब घातलेली मुलगी एक दिवस भारताची पंतप्रधान बनेल'

...हा तर उद्धव ठाकरेंचा प्रश्न

आगामी निवडणुका संदर्भात प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युती संदर्भात त्यांना प्रश्न विचारण्याता आला. त्यावर ते म्हणाले युती करण्याबाबतचा तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही बाळासाहेबांचा पूर्वीही आदर करत होतो.

आजही आदर करत आहे आणि उद्याही करत राहणार. वंचित समाजास न्याय देण्याचा प्रयत्न आमचा होता तो आम्ही केला. त्यांच्याबरोबर आमची युती तुटणे यामागे मोठे कारण आहे, ते आता घाईघाईत सांगणे शक्य होणार नाही. वंचित बहुजन आघाडी बरोबर युती मोडण्या संदर्भात त्यांनी पत्रकाराना या प्रकारे प्रतिक्रिया दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.