Ashadhi Ekadashi 2023 Date: आषाढी एकादशी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, तिथी आणि महत्व

Ashadhi ekadashi kadhi ahe? : आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात.
Ashadhi Ekadashi 2023 Date: ashadhi ekadashi kadhi ahe
Ashadhi Ekadashi 2023 Date: ashadhi ekadashi kadhi ahesakal
Updated on

प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात. ज्यावर्षी अधिक मास असेल, त्यावर्षी दोन एकादशी अधिक असतात. म्हणजेच सामान्यपणे वर्षाला 24 असलेल्या एकादशी अधिक मासाच्या वर्षात 26 होतात.

आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते. अनेक ठिकाणी ही तिथी पद्मनाभा एकादशी म्हणून ओळखली जाते. आषाढी एकादशीचे महाराष्ट्रात महत्त्व अतिशय वेगळे आहे.

पंढरपुरात विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेले वारकरी दाखल होतात. पंढरपूरला राज्यातील विविध भागांतून लाखों वारकरी पायी जातात. पंढरपूरला संत ज्ञानेश्वरांपासून ते जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांच्या पालख्या मार्गस्थ होतात. आषाढी एकादशी कधी आहे, मुहूर्त, पूजाविधी आणि महत्व जाणून घेऊया.

Ashadhi Ekadashi 2023 Date: ashadhi ekadashi kadhi ahe
BRSला रोखण्यासाठी CM शिंदेंनी उचललं पाऊल; के. चंद्रशेखर राव यांच्याआधीच पोहचले विठुरायाच्या दर्शनाला

आषाढी एकादशी मुहूर्त

आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशी 29 जून रोजी पहाटे 3:18 वाजता सुरू होईल आणि 30 जून रोजी दुपारी 2:42 वाजता समाप्त होईल.

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे आषाढी एकादशी गुरुवार २९ जून २०२३ रोजी साजरी करण्यात येणार आहे.

आषाढी एकादशीची पूजाविधी

विठ्ठल हा विष्णूचा अवतार समजण्यात येतो. त्यामुळे आषाढी एकादशीला पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनाला रीघ लागते. एकादशीच्या एक दिवस आधी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहावे. पहाटे उठून एकादशीला स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करावे. हा संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो.

हरिभजन करत रात्री जागरण करावं. तसेच विठ्ठल नामाचा जयघोष करत पूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा. पंढरपूरमध्ये यादिवशी असणारे वारकरी विठ्ठलाची आरती, विठ्ठल नामाचा जयघोष करतात. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणं सोडावे. विष्णू देवाची या दोन्ही दिवशी पूजा करावी आणि अहोरात्र तुपाचा दिवा देखील लाववा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.