Ashadhi Ekadashi : पंढरपुरात वारकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विखेंसोबत खेळली 'फुगडी'

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या शासकीय महापुजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपुरात दाखल झाले आहेत.
ashadhi ekadashi 2023 cm shinde radhakrishna vikhe patil
ashadhi ekadashi 2023 cm shinde radhakrishna vikhe patilesakal
Updated on
Summary

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत शिवसेना नेते भरत गोगावले आणि आमदार शहाजीबापू पाटील हे देखील पंढरपुरात उपस्थित आहेत.

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या शासकीय महापुजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपुरात दाखल झाले आहेत. पंढरपुरात दाखल झाल्यानंतर वारकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शिंदे आणि विखे यांनी फुगड्याही खेळल्या.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत शिवसेना नेते भरत गोगावले आणि आमदार शहाजीबापू पाटील हे देखील पंढरपुरात उपस्थित आहेत. आज (गुरुवार) पहाटे मुख्यमंत्री विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी मंदिरात जाणार आहेत.

शासकीय पूजेनंतर मंदिर समितीकडून होणारा सत्कार स्वीकारून पहाटे साडे चार वाजता विश्रामगृहाकडं निघणार आहेत. शिवाय, आज सकाळी 10 वाजता विश्रामगृह इथं अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी 11 वाजता तीन रस्ता येथे आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या अन्नदान कार्यक्रमात उपस्थिती लावणार आहेत.

ashadhi ekadashi 2023 cm shinde radhakrishna vikhe patil
Ashadhi Ekadashi : CM शिंदे सहकुटुंब शासकीय महापूजेला हजर राहणार; किती वाजता असणार पूजा? जाणून घ्या शेड्यूल

दुपारी 11.30 वाजता तीन रस्ता येथे सुरु असलेल्या महाआरोग्य शिबिरात जाऊन वारकऱ्यांशी संवाद आणि महाशिबिराची पाहणी करणार आहेत. दुपारी 12 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या कृषी प्रदर्शनाला भेट देणार असून तेथून पुन्हा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनं सोलापूरकडे रवाना होतील.

ashadhi ekadashi 2023 cm shinde radhakrishna vikhe patil
Sangli : कर्नाटकसोबत पाणी करार कराच! 'या' 32 गावांना होईल लाभ; कायदेशीर स्वरूप देणं आवश्‍यक!

मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रिमंडळातील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कामगार मंत्री सुरेश खाडे, अब्दुल सत्तार अशी मंत्र्यांची फौज पंढरपुरात दाखल झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.