Ashadhi Ekadashi: विठुरायाच्या दर्शन रांगेत गोंधळ; शासकीय महापूजेनंतरही दर्शनाची रांग वेगाने पुढे सरकत नसल्यामुळे भाविक आक्रमक

भाविक आक्रमक झाल्यानंतर त्यांनी मंदिर समिती मुर्दाबादची घोषणाबाजी केली
Ashadhi Ekadashi
Ashadhi EkadashiEsakal
Updated on

आज आषाढी एकादशी. विठ्ठल दर्शनासाठी राज्याच्या कानकोपऱ्यातून वारकरी पंढरपुरात दाखल झालेत. आज पंढरी नगरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमली आहे. विठ्ठल दर्शनासाठी गोपळपुरच्या पुढेपर्यंत रांगा लागल्या आहेत. भाविकांची गर्दी वाढतच चालली आहे. दर्शनासाठी तब्बल 24 ते 26 तास भाविकांना रांगेमध्ये उभं राहवं लागत आहे. दरम्यान रांग पुढे सरकत नसल्यामुळे भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महापूजा पहाटे संपन्न झाली. त्यानंतरही विठ्ठलाच्या दर्शनाची रांग लवकर पुढे सरकत नसल्याने उपस्थित भाविकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. पोलिसांच्या मदत केंद्राजवळ जाऊन पोलिसांनाच जाब विचारात मंदिर समिती मुर्दाबादच्या घोषणाबाजी करत भाविकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.(Latest Marathi News)

तर यावर्षी मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा सुरू असताना आधी भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येत होते. पण यावेळी शासकीय महापूजा सुरू असताना देखील मुख दर्शनाची रांग सुरु ठेवल्याने जवळपास दीड ते दोन लाख भाविकांना मुखदर्शन घेता आलं आहे.(Latest Marathi News)

Ashadhi Ekadashi
Sharad Pawar: "पवारांनी आमचा वापर केला, रणनीती आखली अन्… शपथविधीच्या तीन-चार दिवस आधी माघार घेतली"

मंदिर समितीची पाद्यपूजा आणि नित्यपूजा झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महापूजा दोन नंतर सुरु होऊन साडे तीन वाजता दोन्ही पूजा झाल्या होत्या . यानंतर मंदिर सत्काराच्या कार्यक्रमात देखील मुख्यमंत्र्यांनी मानाच्या वारकऱ्याच्या सत्कारानंतर कोणालाही भाषणाची संधी न देता थेट स्वतः भाषण करून कार्यक्रम वेळे आधी पूर्ण करत मंदिर सोडण्यात आले. मात्र यानंतर मंदिराकडून दर्शनाचा वेग वाढणं अपेक्षित होतं मात्र अद्याप रांग पुढे सरकत नसल्याने भाविक आक्रमक झाले आहेत.(Latest Marathi News)

Ashadhi Ekadashi
Ashadhi Wari : आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान मोदींनी केलं मराठीत खास ट्वीट

मुख्यमंत्र्यांकडून शासकीय महापूजेनंतर व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र तरीही दर्शनाची रांग साथ गतीने पुढे चालल्याने रात्री 10 पासून दर्शन रांगेतील भाविक अजून गोपाळपूर पत्राशेड येथेच असल्यामुळे भाविकांचा संताप वाढला.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.