कऱ्हाड (सातारा) : वारी बंदी (Ashadhi Ekadashi Wari) म्हणजे हिंदुस्थानच्या श्वासालाच बंदी घातल्यासारखे आहे. वारीबाबत राज्य शासनाची (Maharashtra Government) कृती दुर्योधन व दुःशासनासारखीच आहे, असा आरोप शिवप्रतिष्ठान हिदुस्थानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide of Shivpratishthan Sanghatana) यांनी केला. बंडातात्या कऱ्हाडकर (Bandatatya Karadkar) यांनी स्थानबद्ध करण्यासह वारीला बंदी घातल्याबद्दलचा निषेध मोर्चा आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे येथे काढण्यात आला. दत्त चौकातून मोर्चा थेट तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी संभाजी भिडे, के. एन. देसाई, सागर आमले, केदार डोईफोडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
वारी बंदी (Ashadhi Ekadashi Wari) म्हणजे हिंदुस्थानच्या श्वासालाच बंदी घातल्यासारखे आहे.
ज्ञानोबा-तुकारामांच्या गजरासह छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. तहसीदार कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर तेथे तहसीदार अमरदीप वाकडे (Tehsildar Amardeep Wakde), नायब तहसीलदार विजय माने, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील मोर्चाला सामोरे गेले. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे त्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर श्री. भिडे यांनी मनोगत व्यक्त केले. वारीला बंदी घालून शासनाने मोठे अपराधी कृत्य केले आहे, असे सांगून श्री. भिडे म्हणाले, सरकार चालवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), अजित पवार व विश्वजीत कदम (Ajit Pawar and Vishwajeet Kadam) अत्यंत चांगली माणसे आहेत. ते शासन चालवत आहेत. पण, ते चुकले आहेत. आपण त्यांना क्षमा करूया. मात्र, चुक त्वरित दुरुस्त केली पाहिजे. बंडातात्यांसारखा संत सध्या कुठेच मिळत नाहीत. 'संत पावले साजरी' या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे वारी होणारच, मात्र आता त्याला बंदी आहे. त्याचा वेगळ्या पद्धतीने निषेध करायला हवा. ज्या-ज्या गावात वारीचा मुक्काम असतो. त्या गावात आजूबाजूच्या गावातील लोकांनी एकत्र येवून मुक्कामच्या दिवशी त्या मुक्काम स्थळी येवून त्यांना आदरांजली वाहूया. एकादशी दिवशी प्रत्येक गावात विठ्ठलाची आरती करायसा हवी. याचे भान ठेवा.
यावेळी शासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे होरपळलेल्या राज्याला, व्यवस्था राखण्यासाठी, कोरोना कमी होण्यासाठी सर्व जनता प्रशासनाला सहकार्य करीत आहे. प्रशासनाचे सर्व निर्बंध सचोटीने पाळत आहे. मागील वर्षी आषाढी कार्तिकीच्या पायी दिंडी सोहळ्याला शासनाने बंधने घातली आणि पायी दिंडी सोहळा रद्द केला. परिस्थिती पाहता हिंदू बांधवांनी तो निर्णय मान्य केला. परंतु, यावर्षी 2021 मध्ये लसीकरण हा पर्याय उपलब्ध असताना व प्रशासनाचे सर्व नियम, अटी-शर्ती पाळून काही निवडक वारकऱ्यांच्यासह पायी वारी व्हावी ही परंपरा, खंडित होऊ नये म्हणून बंडातात्या कराडकर यांनी प्रयत्न केले असता, प्रशासनाने त्यांना अटक करून त्यांना स्थानबद्ध केले आहे.
पंढरपूर निवडणूक, पुण्यात राजकीय कार्यालयाचे उद्घाटन, मुंबईमध्ये मेट्रोत गर्दी साखर कारखान्याची निवडणूक (Sugar factory election), वाढदिवसाला असे सगळ चालते. मात्र, भक्तीभावाने हिंदू धर्मातील धार्मिक परंपरा (Religious traditions in Hinduism) चालत नाही. ती खंडित करण्याचा शासनास कोणताही अधिकार नाही. शासनाची प्रजेसाठीजी कामे आहे, ती शासन करतच नाही. परंतु, हिरीहिरीने हिंदू धर्मातील (Hinduism) प्रथा परंपरा पालन करणे यासाठी अटकाव-निर्बंध करणे हेच शासनाचे कार्य झाले आहे, म्हणून आम्ही शासनाचा जाहीर निषेध करत आहोत, असेही भिडे गुरुजींनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.