आषाढी पायी वारीचा कार्यक्रम जाहीर; वाचा संपूर्ण वेळापत्रक

येत्या 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे.
Pandharpur Wari Updates
Pandharpur Wari Updatesesakal
Updated on

पुणे : कोरोनाच्या जवळपास दोन वर्षांच्या संकटानंतर कमी झालेल्या कोरोना रूग्णसंख्येमुळे आषाढी पायी वारी होणार आहे. येत्या 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. कोरोनानंतर तब्बल दोन वर्षानंतर आषाढी पायी वारी होणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण असून, वारकरी तयारीला लागले आहे. पंढरपूरमध्ये एकादशीच्या आदल्या दिवशी झालेल्या बैठकीत पायी वारीचे वेळापत्रक सादर करण्यात आले आहे.

Pandharpur Wari Updates
मोदी मंत्रिमंडळात पुन्हा फेरबदलाच्या हालचाली

दरम्यान, सोहळा 21 जूनला आळंदीतून पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. तिथीची वृद्धी झाल्याने लोणंदमध्ये (जि. सातारा) अडीच दिवस; तर पुणे, सासवड व फलटणमध्ये प्रत्येकी दोन दिवस सोहळा मुक्कामी राहील. तर, दिंडीकऱ्यांच्या मागणीनुसार संस्थानच्या सही शिक्क्याने दिंडीकऱ्यांना वाहन पास दिले जाणार आहे. दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखपदी विकास ढगे यांची निवड करण्यात आली.

Pandharpur Wari Updates
DGCA ने 90 पायलट्स बोइंग 737 मॅक्स उड्डाण करण्यापासून रोखलं

असा असेल वारीचा कार्यक्रम

  • 21 जून - संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं प्रस्थान

  • 22,23 जून - पुण्यात मुक्काम

  • 24,25 जून - सासवड

  • 26 जून - जेजुरी

  • 27 जून - वाल्हे

  • 28, 29 जून - लोणंद

  • 30 जून - तरडगाव

  • 1, 2 जुलै - फलटन

  • 3 जुलै - बरड

  • 4 जुलै - नातेपुते

  • 5 जुलै - माळशिरस

  • 6 जुलै - वेळापूर

  • 7 जुलै - भंडीशेगाव

  • 8 जुलै - वाखरी

  • 9 जुलै - पंढरपूर

  • 10 जुलै - आषाढी एकादशी

Pandharpur Wari Updates
भारतात 24 तासात 1,088 कोरोना रूग्णांची नोंद तर, 26 मृत्यू

येथे होणार रिंगण सोहळा

पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर आणि इसबावी येथे उभे रिंगण तर पुरंदावडे (सदशिवनगर), पानीव पाटी, ठाकुरबुवा आणि बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होणार आहे.

श्री क्षेत्र पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळा नियोजनाची बैठक झाली. पालखी सोहळ्याचं मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीस श्रीमंत उर्जितसिंह शितोळे, प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई, विश्वस्थ डॉ. अभय टिळक, हभप नामदेव महाराज वासकर, राणू महाराज वासकर, श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ माऊली जळगावकर, दिंडी समाजाचे अध्यक्ष भाऊ महाराज गोसावी, सचिव मारुती कोकाटे, बाळासाहेब रंदवे, भागवत चवरे, भाऊ फुरसुंगीकर, सोपानकाका टेंबुकर, गुरुजीबुवा राशिनकर, शरद गायकवाड, बाळासाहेब उकळीकर, एकनाथ हांडे, दिनकर वांजळे, राजाभाऊ थोरात, बाळासाहेब वांजळे, व्यवस्थापक माऊली वीर, सह व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांच्यासह दिंडी प्रमुख आणि फडकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.