Ashadhi Wari 2023 : संविधान अन् संत विचारांमध्ये नेमके साम्य काय माहितीये?

हेच साम्य सांगण्यासाठी गेली १० वर्ष संविधान संमता दिंडी काढण्यात येते.
Ashadhi Wari 2023
Ashadhi Wari 2023esakal
Updated on

Samvidhan Samta Vihar And Sant Vichar Similarity : भारतात लोकशाही प्रस्थापित होताना त्याचा पाया रोवणारा आणि आजवर देशाला शिस्तबद्धतेत चालवणारे संविधान संपूर्ण देशवासियांना पूजनीय आहे. याशिवाय लोकांना अजून एक गोष्टी पूजनीय आहे ती म्हणजे संत विचार. पण तुम्हाला माहितीये का, संविधान आणि संत विचारांमध्ये खूप साम्य आहे.

स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी होऊन गेलेल्या संतांनी आपल्या अभंगांतून, दोह्यांमधून जन जागृतीसाठी व्यक्त केलेले विचार आणि आपल्या संविधान सांगितलेले आपले हक्क, कर्तव्य यात खूप साम्य आहे.

आषाढी वारी

शेकडो वर्षांपासून भक्तांचा मेळा पायी चालत तर पांडुरंगाच्या चरणाशी जातो. त्यांच्यात भक्ती, भावाचा पूर ओसंडत असतो. या वारीसाठी लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात. शेकडो किलोमीटर पायी कापताना अनेक गावे, शहरे पार करत ही वारी जात असते. त्यामुळे संत विचारांनी भारावलेल्या या भाविकांबरोबरच अनेकांपर्यंत प्रबोधनात्मक विचार पोहचवणे शक्य होते.

म्हणूनच या वारीच्या निमित्ताने अनेक विचारी ग्रुप वारीत सहभागी होतात आणि प्रबोधनात्मक विचार लोकांपर्यंत पोहतवतात.

Ashadhi Wari 2023
Ashadhi Wari 2023 : विठ्ठल भक्तांना वारकरी का म्हणतात? वारकऱ्यांसाठीचे नियम काय आहेत?

प्रबोधन विचारांच्या दिंडी

भाविकांच्या पंढपूर वारीत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज पालख्यांबरोबरच विविध अनेक पालख्या, दिंडी सहभागी होत असतात. काही दिंडी आपला एक वेगळा सामाजिक विचार घेऊन लोकांचे प्रबोधन करत असतात. अशाच काही दिंडी म्हणजे संविधान समता दिंडी, समता दिंडी, हरीत वारी, रनवारी आदी विषयांवर या दिंडी जनजागृतीचे काम यात करतात.

Ashadhi Wari 2023
Ashadhi Wari 2023 : यंदा सोन्या अन् खासदार ओढणार संत तुकाराम महाराजांची पालखी!

संविधान समता दिंडी

संतांनी आपल्या अभंगांतून कायमच समतेचा विचार मांडले आहेत. त्यांनी कायमच कर्मकांडापेक्षा कर्मावर भर दिला आहे. त्यांचे हेच विचार संविधानातील कर्तव्य आणि हक्कांशी आपल्याला कसे जोडतात हे या दिंडीतून ते जनतेला समजवतात. यासाठी संविधान समता पालखीही निघते. यंदा या दिंडीचे १० वे वर्ष असून यंदा १३ जून २०२३ रोजी ही दिंडी महात्मा फुले वाडा येथून निघणार आहे.

Ashadhi Wari 2023
Ashadhi Wari 2023 : राजेश जुन्नरकरांच्या रांगोळीची कीर्ती पंढरपूरपर्यंत...!

या दिंडीत पथनाट्य, पोस्टर आणि एक दिवसाची वारी अशा उपक्रमांनी संविधान आणि संत विचार यातील साम्य जनतेला सांगितले जाते. याविषयी संयोजन मंडळाच्या सरस्वती शिंदे यांच्याशी सकाळने संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या, "संतांचे अभंग, दोहे यातून ते संविधानाशी कसे निगडीत आहेत ते सांगतो. जसे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले.., यातून संत तुकारामांनी विज्ञानवादी होण्याचे धडे घातले आहेत. मूर्ती पूजक न होता लोकांमध्ये देव बघायला सांगितला आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे... यात पर्यावरणाविषयी जागरुकता आणण्याचा प्रयत्न आहे. जो आपल्या संविधानात आपल्या कर्तव्यांमध्येही आहे. अशा प्रकारे ही जनजागृती केली जाते. '

यात बंधुता, मानवता, समानता, एकता याच्याशी जोडणारे साधारण १५-१६ अभंग, दोहे संत कबीर, तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव, तुकडोबा, एकनाथ अशा विविध संतांचे विचार आणि संविधान यांची सांगड घातली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.