Wakhari Vihir Know As Bajirao Vihir : पंढरपूरच्या वारी सोहळ्यात रिंगणाची परंपरा फार जूनी आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात तरडगावजवळील चांदोबाचा लिंब, वाखरीजवळील बाजीरावाची विहीर आणि वाखरीजवळ अशा तीन, तर माळशिरस, खुडुस फाटा, ठाकूरबुवा समाधी, भंडीशेगावच्या पुढे अशा चार ठिकाणी गोल रिंगण होतं.
तर तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात बेलवंडी, इंदापूर,अकलूज, माळीनगर, बाजीरावची विहीर आणि वाखरी इथे गोल आणि उभ्या रिंगणाची परंपरा आहे. जेव्हा पायी वारीचे रुपांतर पालखी सोहळ्यात झाले तेव्हापासून रिंगणाची परंपरा सुरू झाली.
काय असतं रिंगण?
सर्व वारकीरी, टाळकरी, झेंडेकरी, मृदुंग वादक, वीणेकरी गोलाकार उभे राहतात. नाम गजर करत टाळ, मृदुंगाच्या एकाच तालात आणि लयीत पायाचा ठेका देत वारकरी नाचू लागतात. या रिंगणात भरधाव वेगात अश्व पालखीला तीन प्रदक्षिणा घालतात आणि अभिवादन करतात.
ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि तुकोबारांच्या पालखीचा मुक्काम असतो. त्यावेळी मध्यभागी देवाचा तंबू, बाजूने इतरांचे तंबू, मध्यभागी समाज आरतीची जागा अशी रचना असते. रिंगण संपले की, या परिघातच हमामा, फुगडी, हुतूतू, आट्यापाट्या, एकीबेकी हे खेळ टाळ-मृदुंगाच्या गजरात सुरू होतात.
रिंगणाची प्रथा का सुरू झाली?
परमार्थ हा गंभीरतेने, स्वतःला क्लेष करून घेत अत्यंत कठीण साधन, अनाकलनीय नसून ते हसत खेळ भगवंताच्या नावात स्वतःला विसरतही साध्य होतं हेच यातून दर्शवीलं जातं.
वाखरीच्या पुरातन विहिरीला बाजीराव विहीर का म्हणतात?
ज्ञानेश्वर पालखी मार्ग आळंदी ते- पंढरपुर या मार्गावरील शेवटचा टप्पा व मुक्काम वाखरी या गावी असते व महत्वाचे म्हणजे येथे उभे व गोल रिंगणाचा सोहळा होत आसतो. महत्वाच्या रिंगणाचे सुरवाती पासून शेवटचे गोल व उभे रिंगण सोहळ्याचे अयोजन होत आले आहे.
असे सांगण्यात येते कीं २०० वर्षा पुर्वी वारकरी सांप्रदायाच्या सुख- सोयींसाठी दुसरे बाजीराव यांनी ही विहीर बांधली. त्यांनी स्वतः ११ वर्ष पालखी सोहळ्याची संगत करत वारी केलेली आहे. दुसरे बाजीराव यांनी ही चिरेबंद दगडी काम करुन आयताकृती विहीरीचे बांधकाम केले आणि म्हणून तिला बाजीराव विहीर हे नांव पडले आहे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.