Ashadhi Wari : पंढरपुरात राजकीय वातावरण तापलं! राहुल गांधी-शरद पवारांना निंबाळकरांचा विरोध; मोहिते-पाटलांच्या निमंत्रणावरून मोठा वाद

आषाढी वारीत चालण्यावरून पंढरपुरात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.
Ashadhi Wari 2024
Ashadhi Wari 2024esakal
Updated on
Summary

शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी काँग्रेसचे नेते आणि विरोध पक्षनेते राहुल गांधी यांना आषाढी वारीचे निमंत्रण दिले आहे.

पंढरपूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आषाढी वारीतील सहभागावरून राजकीय भजन सुरू झाले आहे. भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjit Singh Naik-Nimbalkar) यांनी याला विरोध करत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षा राजकारणासाठी वारकऱ्यांचा वापर करत असल्याची टीका केली आहे.

निंबाळकर यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) प्रमुखांची भेट घेऊन गांधी यांना पालखी सोहळ्यात वॉक करण्यास विरोध असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, निंबाळकरांच्या टीकेला माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील (Madha MP Dhairyasheel Mohite-Patil) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. निंबाळकर यांनी नैराश्यातून राहुल गांधी आणि शरद पवारांच्या वारीत चालण्याला विरोध केला आहे. यातूनच त्यांची मानसिकता लक्षात येते, अशी टीका केली आहे.

Ashadhi Wari 2024
Ashadhi Palkhi Sohala : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींनंतर CM शिंदे प्रथमच आषाढी यात्रेत वाखरी ते पंढरपूर चालणार

आषाढी वारीत चालण्यावरून पंढरपुरात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. अलीकडेच शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी काँग्रेसचे नेते आणि विरोध पक्षनेते राहुल गांधी यांना आषाढी वारीचे निमंत्रण दिले आहे. गांधी यांनी निमंत्रण स्वीकारले असून वारीत सहभागी होण्याचे आश्वासन ही दिले आहे. त्यानंतर मात्र भाजपच्या माजी खासदाराने राहुल गांधी यांच्या आषाढी वारीतील सहभागास आक्षेप घेत विरोध दर्शवला आहे.

वारकऱ्यांचा पायी प्रवास सुखकर व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. यामध्ये मोदी यांनी कधीही राजकारण केले नाही. मात्र राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राहुल गांधी आणि शरद पवार यांनी आषाढी वारीत चालण्याचे ठरवले आहे. आषाढी सोहळ्याचा राजकारणासाठी वापर करू नये. राहुल गांधी यांनी यापूर्वी कधीही विठ्ठलाचे दर्शन घेतले नाही. त्यांना आता दर्शन घ्यायचे असेल तर पालखी मुक्कामी जाऊन दर्शन घ्यावे, असा सल्लाही निंबाळकर यांनी दिला आहे.

Ashadhi Wari 2024
Ashadhi Wari 2024 : चांदीच्या मेघडंबरीत विसावली विठुमाउली; नांदेडच्या भाविकाकडून तब्बल 2 कोटी 45 लाखांची चांदी अर्पण

माजी खासदार निंबाळकरांच्या टीकेला माढ्याचे शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी एखादी राजकीय व्यक्ती येणार असेल तर त्याचे कोणीही राजकारण करू नये. इंडिया आघाडीचा नेता असो किंवा एनडीए सरकारचा नेता. आषाढी वारीही महाराष्ट्राची संस्कृती आणि धार्मिक परंपरा आहे. ती सातासमुद्रापार गेली आहे. विरोध करून या परंपरेला कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये. वारीचा सोहळा पाहण्यासाठी आणि विठुरायाच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भाविक येतात. एखादा राष्ट्रीय पातळीवरील नेता येत असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. यामध्ये राजकारण आणू नये, असेही ते म्हणाले.

निंबाळकर अद्यापही पराभवाच्या धक्क्यात

मोठ्या माणसांवर टीका करून स्वतःचे महत्त्व वाढवून घेण्याचा माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. निंबाळकर अजूनही पराभवाच्या धक्क्यातून सावरले नाहीत. त्याच नैराश्यातून त्यांनी राहुल गांधींना विरोध केल्याची टीकाही खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.