उद्धव ठाकरेंना कधी भेटणार? या प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी एका शब्दात उत्तर दिलंय.
पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या गटातील आमदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटणार का, याकडं सर्वांचं लक्ष लागलं असतानाच एकनाथ शिंदेंनी याबाबत भाष्य केलंय.
दिल्ली दौऱ्यात राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री अशा संविधानिक पदावरील व्यक्तींना भेटलो. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांच्या सहकाऱ्याची आवश्यकता असते, असं त्यांनी म्हटलं असून उद्धव ठाकरेंना कधी भेटणार, मंत्रिमंडळ विस्तार या प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी एका शब्दात उत्तर दिलंय.
आषाढी एकादशीला (Ashadi Ekadashi) पंढरपूर येथील महापूजा संपन्न झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिराबाहेर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. भाजपा नेत्यांची भेट घेतली, आता उद्धव ठाकरेंची भेट घेणार का? असा प्रश्न विचारला असता शिंदे म्हणाले, सर्वसामान्यांच्या विकासासाठी आम्ही सरकार स्थापन केलंय. यात केंद्र सरकार आपल्या पाठिशी राहावं यासाठी आम्ही दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. यावर पत्रकारांनी ठाकरेंना भेटणार का, मंत्रिमंडळ विस्ताराचं कधी अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. यावर ‘लवकरच’ असं उत्तर देत शिंदे तिथून निघाले.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सन्मानानं बोलावलं तर आम्ही मातोश्रीवर नक्की जाऊ, असं विधान केलं होतं. मात्र, आजूबाजूच्या काही लोकांना उद्धव ठाकरेंनी दूर ठेवावं, असा सल्लाही दीपक केसरकर यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर शिंदेंनी हे विधान केल्यानं शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकत्र येणार का, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.