मुंबई : वारंवार पक्षातील नेत्यांविरोधात विधान केल्याप्रकरणी आमदार आशिष देशमुख यांचं काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं आहे. पक्षानं त्यांना तीन दिवसांचा अल्टिमेट दिला असून काँग्रेसच्या शिस्तपालन समितीनं कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. (Ashish Deshmukh suspended from Congress gives notice for reason)
काँग्रेसच्या शिस्तपालन समितीनं आशिष देशमुख यांना पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिशीत तीन दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. देशमुखांना सध्या पक्षातून निलंबित करण्यात आलं असून जर त्यांनी या कालावधीत समाधानकारक उत्तर दिलं नाही तर त्यांची पक्षातून कायमची हाकालपट्टी देखील होऊ शकते.
देशमुखांनी नेमकं काय म्हटलं होतं?
नाशिकच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी काँग्रेसमध्ये झालेल्या गोंधळावरुन आशिष देशमुखांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर नाना पटोले यांनी केंद्रीय नेतृत्वाकडं देशमुख यांची तक्रारही केली होती. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशमुख यांनी राहुल गांधींना ओबीसी समाजाची माफी मागावी अशी सूचना केली होती. देशमुखांच्या या विधानांची काँग्रेसनं दखल घेतली असून त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरु केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.