"त्यावेळी गोधडी ओली करणाऱ्यांनी तर..."; शेलारांचा राऊतांवर घणाघात

बाबरी मशीद पडली तेव्हा शिवसेना कुठे होती, या फडणवीसांच्या सवालावरून आरोप प्रत्यारोपांचा खेळ रंगलाय.
Ashish Shelar Sanjay Raut
Ashish Shelar Sanjay RautSakal
Updated on

भाजपाची बुस्टर डोस सभा काल मुंबईत पार पडली. या सभेदरम्यान भाजपा नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. बाबरी मशीद पडली तेव्हा शिवसेना कुठे होती, असा सवालही फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला. त्यावरून सध्या आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे.

Ashish Shelar Sanjay Raut
बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा मी तिथं होतो - देवेंद्र फडणवीस

संजय राऊत यांनी फडणवीसांच्या या प्रश्नावर आज उत्तर दिलं. बाबरीच्या वेळी शिवसेना कुठं होती हे तुमच्याच पक्षाच्या नेत्यांना विचारा, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिटोला लगावला. राऊत म्हणाले, बाबरीचाच जर विषय असेल आणि कुणी म्हणत असेल त्यावेळी शिवसेना कुठं होती, तर त्यांच्याच पक्षातील सुंदरसिंग भंडारी यांना जाऊन विचारा. त्याकाळातला सीबीआयचा अहवाल तपासा, गुप्तचर खात्याचा अहवाल तपासा. त्यानंतर त्यांना कळेल शिवसेना कुठं होती ते.

Ashish Shelar Sanjay Raut
बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा मी तिथं होतो - देवेंद्र फडणवीस

आता या अहवालाच्या मुद्द्यावरून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी राऊतांना आव्हान दिलं आहे. अहवाल दाखवा नुसती बोलबच्चनगिरी कसली करताय असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला. शेलार म्हणाले," आख्ख्या देशाला माहित आहे हे आंदोलन साधूसंतांनी सुरू केलं, हिंदूंनी सुरू केलं. तुमचा जन्म ६० नंतरचा आहे, हे आंदोलन त्याआधीपासून सुरू होतं. जन्म होण्याआधी आणि गोधडी ओली करण्यावेळेला मी कारसेवेला होतो, हे म्हणणाऱ्यांनी आत्मचिंतन करावं. उगाच कोणाचं तरी श्रेय घेण्याच्या भानगडीत पडू नका. त्यावेळी गोधडी ओली करणाऱ्यांनी तर तोंडं बंदच करा".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.