Ashish Shelar : ''पक्ष फोडायचा होता... त्यांना धडाच शिकवायचा होता'' आशिष शेलार स्पष्टच बोलून गेले

Ashish Shelar BJP : भाजप नेते आशिष शेलार यांनी मागच्या काही काळापासून सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीबद्दल थेटपणे भाष्य केलं आहे. आम्हला पक्ष फोडायचा होता, त्यांना धडा शिकवायचा होता.. अशा शब्दात त्यांनी पूर्वाश्रमीच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल मत मांडलं.
Ashish Shelar BJP
Ashish Shelar BJPesakal
Updated on

Ashish Shelar BJP : भाजप नेते आशिष शेलार यांनी मागच्या काही काळापासून सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीबद्दल थेटपणे भाष्य केलं आहे. आम्हला पक्ष फोडायचा होता, त्यांना धडा शिकवायचा होता.. अशा शब्दात त्यांनी पूर्वाश्रमीच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल मत मांडलं. ते 'एबीपी माझा'च्या 'माझा व्हिजन' या कार्यक्रमामध्ये बोलत होते.

आशिष शेलार म्हणाले की, 2019 मध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करुन राज्यात आणि मुंबईत आमचं नुकसान झालं होतं. तेव्हा आम्हाला विश्वासघातकी मित्र मिळाला, देशाच्या राजकारणात कुणी इतसं विश्वासघातकी असूच शकत नाही. आम्ही सातत्याने त्यांना पचवत गेलो होतो. पण मुंबईकरांची इच्छा आता ठाकरेंविना भाजप आणि ठाकरेंविना मुंबईचा विकास, अशी आहे.

Ashish Shelar BJP
MS Dhoni IPL 2024 : एम एस धोनीची नवी पोस्ट, नव्या 'रोल'चा फोडला बॉम्ब

शेलार पुढे म्हणाले की, आम्ही कधीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर गेलो नाही. भाजप आणि सेना यांचंच सरकार आलं पाहिजे या मताचे आम्ही होतो. २०१९ पहाटेचा शपथविधी ही एक रणनीती होती. त्या माध्यमातून शरद पवारांना धक्का देण्याचं, धडा शिकवण्याचं काम आम्ही केलं.

''त्यांना दंडीत करायचं होतं. त्याचं कारण जनतेने आमच्या युतीला मतं दिली होती. त्यानंतर त्यांनी ज्यांना-ज्यांना फोडलं त्यांना आम्ही फोडलं. आम्ही नंतर अजित पवारांच्या पक्षासोबत युती केली. पवारांचा पक्ष फोडायचा होता.. त्यांना धडा शिकवायचा होता'' अशा शब्दात आशिष शेलारांनी भूमिका मांडली.

Ashish Shelar BJP
Electoral Bond : इलेक्टोरल बाँडचा तपशील जाहीर करण्यासाठी SBI ने मागितला ३० जूनपर्यंतचा वेळ

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जनता भाजप युतीसोबत राहणार असल्याचा विश्वास शेलारांनी यावेळी बोलून दाखवला. भाजपने २०१९ नंतर केलेल्या राजकारणावर शेलारांनी ज्या थेटपणे उत्तरं दिली, त्याची चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.