मुंबई : जनतेचे प्रश्न मांडले म्हणून ठाकरे सरकारने (Thackeray Government) अहंकाराने आम्हा १२ आमदारांना असंविधानिक पद्धतीने एक वर्षासाठी निलंबित केलेय, असा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज बुधवारी (ता.२२) केला आहे. शेलार पुढे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की आमदार म्हणून वांद्रे पश्चिमच्या जनतेचे प्रश्न अधिवेशनात मांडण्यापासून रोखल्याने, जनतेच्या अधिकारावरही गदा या सरकारने आणलेय, अशी टीका (Mumbai) त्यांनी केली. आमचा या अन्यायाविरोधात संघर्ष सुरुच राहिल असा निर्धार आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.(Ashish Shelar Said, 12 MLAs Suspended Due To Thackeray Government Ego)
बारा आमदारांचे निलंबन
पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या सोबत गैरवर्तन केल्या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन करण्यात आले आहे. आशिष शेलार, पराग अळवणी, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, जयकुमार रावल, गिरीश महाजन, नारायण कुचे, राम सातपुते, योगेश सागर, हरिश पिंपळे, किर्तीकुमार उर्फ बंटी बागडिया या बारा आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांनी या निलंबनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. याबाबतची सुनावणी नवीन वर्षात ११ जानेवारी रोजी होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.