शनिवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने कोकण मार्गांवर जाणाऱ्या वाहनांना 5 ते 19 सप्टेंबर दरम्यान टोल किंवा रोड टॅक्स भरण्यापासून सूट दिली आहे. तर दुसरीकडे आता खाजगी ट्रॅव्हल्सची मागणी वाढत आहे. त्यामुळे आता खाजगी ट्रॅव्हल्सच्या दरात वाढ होत आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही दरवाढ आकारण्यात येते. यावर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांना इशारा दिला आहे.