मराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या पोस्टवर अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

आपली दिशाभूल होऊ नये व आपणांकडून चुकीची माहिती जाऊ नये, एवढीच अपेक्षा...
political
politicalesakal
Updated on

मागील काही दिवसांपासून खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांचे मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरे, मोर्चे, मुक आंदोलनं सुरु आहेत. राज्यसरकारने यावर तात्काळ मार्ग काढावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. मराठा समाजाला (Maratha reservation) लवकरात लवकर आरक्षण मिळवूण द्यावे यासाठी योग्य ते निर्णय घ्यावे असेही त्यांनी वेळोवेळी सुचवले आहे. दरम्यान आता याप्रकरणी त्यांनी सोशल मिडियाद्वारे (Social media) एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये नेते अशोक चव्हाण (Ashok chavan) यांचा उल्लेख केला आहे.

यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या शासकीय निवासस्थानी समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी गेले असताना यांनी त्याकडेही दुर्लक्ष करून पोलिसी बळाचा वापर करत समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, असल्याचा आरोप संभाजीराजे केला आहे. मात्र त्यांच्या या पोस्टला चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

political
नागपूर : किरीट सोमय्या विरोधातील तक्रार फेटाळली

अशोक चव्हाण म्हणाले, सन्माननीय खासदार संभाजीराजे, सकाळच्या घटनेबाबत आपला गैरसमज झाला असावा किंवा आपल्याला जाणीवपूर्वक चुकीची माहिती देण्यात आली असावी. शिष्टमंडळाला मी भेट नाकारली नव्हती. पाच ते सात जणांच्या शिष्टमंडळाने चर्चेला यावे, असे निमंत्रण मी दिले होते. परंतु, त्यांना ते मान्य नव्हते. आपली दिशाभूल होऊ नये व आपणांकडून चुकीची माहिती जाऊ नये, एवढीच अपेक्षा, याबाबत मी ट्वीट करून वस्तुस्थिती अवगत करून दिली होती, असेही ते म्हणाले आहेत.

काय लिहलंय संभाजीराजेंची पोस्टमध्ये

मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या शासकीय निवासस्थानी समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी गेले असताना चव्हाण यांनी त्यांची भेट व निवेदन घेण्याचे नाकारले. यावर नाराजी व्यक्त करण्यासाठी व त्यांच्यापर्यंत समाजाचा आवाज पोहोचवण्यासाठी या समन्वयकांनी त्याठिकाणी संविधानिक मार्गाने निदर्शन केले. मात्र ना. चव्हाण यांनी त्याकडेही दुर्लक्ष करून पोलिसी बळाचा वापर करत समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारे आपली जबाबदारी झटकून, शांततेच्या मार्गाने समाजाच्या मागण्या मांडण्यासाठी आलेल्या बांधवांना अशी वागणूक देणे, हे कितपत योग्य आहे ? याचा विचार उपसमितीचे अध्यक्ष म्हणून चव्हाण यांच्याबरोबरच राज्य सरकारनेही करावा.

political
देशात कोरोनाचा स्फोट! २४ तासात ३ लाख नवे रुग्ण; 491 मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.