राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी आज(मंगळवारी) भाजपमध्ये प्रवेश केला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, हर्षवर्धन पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. अशोक चव्हाण आणि समर्थक माजी आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशावेळी अशोक चव्हाण यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अर्ज भरत रितसर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर चव्हाणांच्या प्राथमिक सदस्य पत्रावर बावनकुळे यांनी सही करत भाजपमध्ये प्रवेश दिला आहे. तेव्हा चव्हाणांनी त्यांच्या हातात पैसे दिले. तो व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर शेअर होत आहे.(membership fee)
चव्हाणांनी बानवकुळे यांना दिलेली नोट त्यांनी बाजुला टेबलवर ठेवली आणि चव्हाणांच्या हातात सही केलेलं पत्र दिलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचे पक्षात स्वागत केले. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेतृत्त्व, अनेक वर्षे विधानसभा आणि लोकसभा गाजवणारे नेते, विविध मंत्रीपद भुषविलेल्या तसेच दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण साहेब आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले.
अशोक चव्हाण सवयीने काँग्रेस बोलून गेले अन्...., अन एकच हशा पिकला
अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला आशिष शेलार यांचा उल्लेख करताना मुंबई भाजपचे अध्यक्ष ऐवजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष, असा केला. त्यांच्या या वक्तव्यावर कार्यालयात एकच हशा पिकला. यावर बाजूलाच बसलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना काँग्रेस नव्हे भाजपचे अध्यक्ष, अशी आठवण करुन दिली त्यांनतर त्यांना पुन्हा चुक सुधारली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.