Ashok Chavan: तुमच्या वडिलांना, तुम्हाला काँग्रेसने खूप काही दिलं, तरी... बाळासाहेब थोरातांचा चव्हाणांवर घणाघात

काँग्रेसच्या नेत्यांनी आज बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेस नेत्यांनी टीका केली. ( Ashok Chavan join bjp)
Ashok Chavan join bjp Congress gave lot to your father Balasaheb Thorat criticize in party meeting
Ashok Chavan join bjp Congress gave lot to your father Balasaheb Thorat criticize in party meeting
Updated on

मुंबई- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये धावपळ सुरु झाली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी आज बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेस नेत्यांनी टीका केली. बाळासाहेब थोरात यांनी अशोक चव्हाणांवर टीका करताना म्हटलं की, दबावामुळे किंवा स्वार्थासाठी ते भाजपमध्ये गेले आहेत. (Balasaheb Thorat criticize Ashok Chavan in party meeting)

बाळासाहेब थोरातांची टीका

भारतीय जनता पक्षामध्ये अशोक चव्हाण गेले आहेत. टायमिंग पाहिला तर दिल्लीत शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, अश्रूधूर सुरु होता तेव्हा त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होत होता. अशोक चव्हाणांच्या वडिलांना काँग्रेसने खूप संधी दिली. त्यानंतर त्यांचे चिरंजिव म्हणून काँग्रेसने अशोक चव्हाण यांना देखील खूप संधी दिली. आता काँग्रेसच्या तत्वज्ञानात असा कोणता दोष निर्माण झाला ज्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी केला.

Ashok Chavan join bjp Congress gave lot to your father Balasaheb Thorat criticize in party meeting
Ashok Chavan Joining BJP: भाजपसोबत नव्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करतोय; पक्ष प्रवेशाआधी अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

अशोक चव्हाण यांच्यावर कोणता दबाव होता का? कोणत्या तरी दबावामुळे किंवा स्वार्थासाठी ते भाजपमध्ये गेले आहेत, असा घणाघात थोरात यांनी केला. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी देखील अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. काँग्रेसने अशोक चव्हाण यांना खूप काही दिलं. मग त्यांनी काँग्रेस का सोडली? काँग्रेस सोडण्यामागचं त्यांनी कारण स्पष्ट करावं, असं ते म्हणाले.

नाना पटोलेंनी साधला निशाणा

१५ तारखेला काँग्रेस पक्षाची मिटिंग आहे. १७ तारखेपासून दोन दिवसाचं शिबिर लोणावळ्यात आहे. त्याला काँग्रेसचे सर्व आमदार उपस्थित राहतील. आम्ही सर्व आमदार एकत्र आहोत. नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. सगळे नांदेडले लोक आमच्याकडे येत आहेत. आम्हाला उमेदवार द्या, त्याला आम्ही निवडून देऊ असं ते सांगत आहेत. आमच्याकडे उमेदवार देखील आहेत, असं नाना म्हणाले.

Ashok Chavan join bjp Congress gave lot to your father Balasaheb Thorat criticize in party meeting
Ashok Chavhan Joining BJP: 'एक चव्हाण गेल्याने फरक पडत नाही', काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्याची प्रतिक्रिया

देशामध्ये आज काय सुरु आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला जात आहे. शेतकरी दिल्लीत येऊ नये म्हणून रस्त्यात खिळे ठोकले जात आहेत. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. अशा पद्धतीने लाठीचार्ज करणाऱ्या सरकारला काय म्हणायचं? विकासासाठी गेले म्हणतात. कशाचा विकास आहे? त्यांचा काय विकास आहे हे आम्हाला माहिती आहे. शेतकऱ्यांना धमकवलं जात आहे.

प्रशासन शेतकऱ्यांचे रक्त सांडत आहे. हिंमत असेल तर पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसमोर जावं. आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावं. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात विश्वास ठेवून जातो म्हणताहेत, हे शेतकऱ्यांचेचं मुलं आहेत. देशात तानाशाही सुरु आहे. या तानाशाही विरोधात आमची लढाई आहे. जनतेचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, असंही नाना पटोले म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.