Ashok Chavan Join BJP : ''पक्ष का सोडला, हे सांगणं चव्हाणांची जबाबदारी'', काँग्रेसची मागणी; रमेश चेन्नीथला यांची पत्रकार परिषद

ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सोमवारी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपल्या विधीमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तसेच काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिला होता.
Ashok Chavan Join BJP
Ashok Chavan Join BJPesakal
Updated on

Ashok Chavan Join BJP : ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सोमवारी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपल्या विधीमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तसेच काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिला होता. मंगळवारी चव्हाणांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य रमेश चेन्नीथला यांनी पत्रकार परिषद घेऊन अशोक चव्हाणांच्या निर्णयावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, पक्षाने अशोक चव्हाणांना काय दिलं नाही? दोनवेळा मुख्यमंत्री केलं, पंधरा वर्षे मंत्री केलं, काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं. एवढंच नाही तर मागच्या वर्षी त्यांना काँग्रेस वर्किंग कमिटीचं सदस्य केलं. तरीही त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेणं दुर्दैवी आहे.

चेन्नीथला पुढे म्हणाले की, अशा पद्धतीने पक्ष सोडून जाणाऱ्यांना लोक स्वीकारणार नाहीत. आम्ही विचारधारेवर काम करणारी लोकं आहोत, आयाराम-गयाराम करणाऱ्यांना राजकारणात कुणीही समर्थन देत नाही. त्यांनी सांगितलं पाहिजे की, त्यांच्यावर ईडीचा दबाव होता का? त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेतही काही खुलासा केला नाही.''

Ashok Chavan Join BJP
Ashok Chavan Join BJP: राज्यसभा की नांदेडमधून लोकसभा? अशोक चव्हाणांची भाजपशी कोणती डिल?

चेन्नीथला पुढे म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्या जाण्याने पक्षाला काहीही फरक पडणार नाही. ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत, त्यांच्यासाठी भाजपने दारं खुली केली आहेत. परंतु अशांमुळे काँग्रेसला काहीही फरक पडणार नाही. आमची काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांशी चर्चा झाली असून तळागाळातले कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मुळात त्यांनी पक्ष का सोडला, हे जनतेला सांगणं त्यांची जबाबदारी असल्याचं चेन्नीथला म्हणाले.

Ashok Chavan Join BJP
Jackky-Rakul Preet Wedding : ना पत्रिका छापणार, ना फटाके फोडणार जॅकी अन् रकूलचं होणार 'इको फ्रेंडली' लग्न!

पक्षाने सोपवली होती मुख्यमंत्री पदाची जबाबदारी

1987-1989 या काळात अशोक चव्हाण यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. ते जिंकून आले. 1992 मध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. 1993 साली सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि गृह राज्यमंत्री म्हणून ते सरकारमध्ये सामील झाले. 2003 मध्ये विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे वाहतूक, बंदरे, सांस्कृतिक कार्य आणि प्रोटोकॉल मंत्रिपदाची जबाबदारी दिली. 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 या काळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.