Ashok Chavan Joins BJP : आदर्श घोटाळ्याचं काय झालं? भाजपत प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण स्पष्टच बोलले

Ashok Chavan Joins BJP : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Ashok Chavan Joins BJP
Ashok Chavan Joins BJP
Updated on

Ashok Chavan Joins BJP : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशामागे आदर्श घोटाळ्याचा काही संबंध आहे का? या घोटाळ्याचं नेमकं काय झालं? असे प्रश्न विरोधकांकडून विचारले जात आहेत. यादरम्यान मी आयुष्याची नवी सुरूवात करत आहे, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी अशोक चव्हाण यांनी आदर्श घोटाळ्याविषयी देखील भाष्य केलं.

भाजपमध्ये प्रवेश करतेवेळी चव्हाण म्हणाले मी ३८ वर्षांचा माझा राजकीय प्रवास मी आज बदल करत आहे. पंतप्राधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा घेऊन राज्यात सकारात्मक काम करता आलं पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे असे अशोक चव्हाण म्हणाले. मी नेहमी सकारात्मक भूमिका घेऊनच काम करत आलो आहे. यापूर्वी देखील आम्ही एकमेकांना साथ दिली आहे. जिल्हा आणि मतदारसंघाला न्याय देण्यासाठी फडणवीसांनी नेहमीच मदत केली आहे. मी जेथे राहिलो तेथे प्रामाणिकपणे काम केलं आहे.

Ashok Chavan Joins BJP
Ashok Chavhan Joining BJP: 'एक चव्हाण गेल्याने फरक पडत नाही', काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्याची प्रतिक्रिया

आगामी निवडणूकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, पक्ष सोडल्यानंतर काही सहकारी विरोधी बोलतात, व्यक्तीगत दोषारोप मी कोणावर करणार नाही असेही अशोक चव्हाण म्हणाले.

सबका साथ सबका विकास हे ब्रीद घेऊन पंतप्रधान मोदींचे देशातील विकासाचे विवीध पैलू पाहूण मी इंप्रेस झालो आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्याप्रमाणं काम करणार आहे. पक्ष जो आदेश देईल ते काम करणार आहे. मी कुठलीही मागणी केली नाही असेही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

Ashok Chavan Joins BJP
Ashok Chavan Joining BJP: भाजपसोबत नव्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करतोय; पक्ष प्रवेशाआधी अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

आदर्श घोटाळ्याचं आता काय झालं?

विरोधकांकडून आदर्श घोटाळ्याचं काय झालं असा प्रश्न विचारला जात आहे. यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, या मुद्द्यावर हायकोर्टात आमच्या बाजूने निकाल लागला आहे. कायदेशीर प्रोसेस जी असेल ती पूर्ण केली जाईल. हा एक राजकीय अपघात म्हणावा लागेल मला एवढंच सांगायचं आहे. हा काही चिंतेचा विषय नाही असेही अशोक चव्हाण म्हणाले.

आदर्श घोटाळा काय होता?

महाराष्ट्र सरकारने युद्धात जीव गेलेल्या सैनिकांसाठी आणि संरक्षण मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसाठी एक इमारत उभारण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या कुलाबा येथे बांधण्यात आलेल्या या इमारतीला आदर्श हाउसिंग सोसायटी असे नाव देण्यात आले होते. ही बांधल्यानंतर आरटीआयमध्ये खुलासा झाला होता की नियम बाजूला ठेवून या इमारतीमधील फ्लॅट अधिकारी, नेत्यांना खूप कमी किंमतीत देणअयात आले आहे. हा घोटाळा २०१० साली बाहेर आला यानंतर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला होता.या घोटाळ्याच्या मुद्द्यावर अशोक चव्हाण यांच्यावर तेव्हाच्या विरोधकांकडून सतत टीका करण्यात आली.

२१ डिसेंबर २०१० साली मुंबई हायकोर्टात घोटाळा झाल्याचे उघड झाले, तसेच ही इमारत पर्यावरणाचे नियम मोडून बांधल्याचे समोर आल्यानंतर ती पाडण्याचे आदेश देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.