Ashok Chavan : अजून राजीनामा नाहीच, मी पुन्हा येतो म्हणत अशोक चव्हाण निघून गेले, राज्यसभा की मंत्रिपद? नेमके कोणते पद मिळणार?

Ashok Chavan Resignation: अशोक चव्हाण लवकरच भाजपत प्रवेश करणार असल्याची सध्या चर्चा आहे.
Ashok Chavan RESIGNATION
Ashok Chavan RESIGNATIONSAKAL
Updated on

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. तत्पूर्वी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यामुळं ते राजीनामा देणार असल्याची चर्चा देखील सुरु होती. पण त्यांनी उद्याप राजीनामा दिलेला नाही. मी पुन्हा येतो असं म्हणत अशोक चव्हाण निघून गेल्याचं सुत्रांकडून कळतं आहे. (ashok chavan meet rahul narvekar and left saying I will come again what exactly happened after meeting)

Ashok Chavan RESIGNATION
Manoj Jarange: 'सगेसोयऱ्यां'साठी जरांगेंचं पुन्हा उपोषण, प्रकृती खालावली; सरकारला दिला इशारा; म्हणाले, १५ तारखेनंतर...

आज राहुल नार्वेकर यांचा वाढदिवस आहे. त्यामुळं अशोक चव्हाण यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांची भेट घेतली असल्याचं सांगितलं जात आहे. पण हे केवळ निमित्त असल्याचंही बोललं जात आहे, कारण त्यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. (Latest Marathi News)

Ashok Chavan RESIGNATION
Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधींची 'भारत जोडो' यात्रा लवकर संपवणार; काय घडलंय नेमकं?

दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार अशोक चव्हाण यांनी नार्वेकरांची भेट घेत राजीनाम्याची प्रक्रिया काय असेल याची माहिती घेतली आणि मी पुन्हा येतो असं सांगून ते निघून गेले. पण आता अशोक चव्हाणांचं काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं एकपत्र व्हायरल झालं आहे. तसेच त्यांच्या लेटरहेडवर विधानसभा सदस्य यापुढे पेनानं माजी असं लिहिलं आहे. त्यामुळं त्यांनी आमदारकीचा देखील राजीनामा दिल्याचीही चर्चा आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.