पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ यांनी सीबीएसई, तसेच 'एनसीईआरटी'च्या अभ्यासक्रमाशी साम्यता साधण्याचा प्रयत्न केला आहे. नीट या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या धर्तीवर विज्ञानशाखेच्या अभ्यासक्रमाची रचना केली आहे. शिक्षण मंडळाने वार्षिक लेखी परीक्षेच्या आराखड्यांमध्येही बदल केला आहे.
नवीन आराखड्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न तसेच एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्नांच्या संख्येमध्ये जुन्या आराखड्याच्या तुलनेत संख्या वाढवली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे ग्रुपिंग मिळविण्यासाठी सुकर झाले आहे त्याचप्रमाणे उदाहरणांची संख्या कमी करून प्रश्नांमध्ये विकल्पांची संख्या वाढवली आहे. जुन्या आराखड्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची ग्रुपला मार्क न मिळाल्यामुळे त्यांना नीट त्याचप्रमाणे एमएच-सीईटी परीक्षेमध्ये जास्त गुण असूनही विद्यार्थी हे एमबीबीएस, इंजिनीअरिंगला जाण्यापासून वंचित राहात होते.
अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेतील अभ्यासक्रमाचा आढावा घेतला असता, भौतिकशास्त्र या विषयांमध्ये मंडळाने काही प्रमाणात अपेक्षित बदल केले आहेत. नवीन अभ्यासक्रमांमध्ये बारावीची काही प्रकरणे किंवा त्या प्रकरणातील काही भाग हा इयत्ता अकरावी भौतिकशास्त्राच्या अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट केला आहे. Gravitation, Elasticity, semiconductors या प्रकरणातील इयत्ता बारावीतील जास्तीत जास्त भाग हा अकरावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. या पूर्वीच्या अभ्यासक्रमांमध्ये बारावीच्या भौतिकशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमांमध्ये एकूण वीस प्रकरणे समाविष्ट होती. परंतु नवीन अभ्यासक्रमांमध्ये एकूण सहा परिशिष्टे आणि केवळ सोळा प्रकरणे समाविष्ट केली आहेत.
Circular motion आणि Gravitation या दोन प्रकरणांची मिळून एकच प्रकरण याचे नाव Rotational Dynamic असे देण्यात आले आहे. त्याचप्रकारे Elasticity आणि Surface tension या दोन प्रकरणांची एकच प्रकरण Mechanical properties of fluids तयार केले आहे आणि या प्रकरणामध्ये Streamline flow, Turbulent flow, pascal's law and application, critical velocity, viscosity, Stoke's law, Bernoulli equation and its application इत्यादी नवीन मुद्द्यांचा समावेश केला आहे.
तिसरे प्रकरण Kinetic theory of gases and radiation यामध्ये बदल नाही. परंतु चौथे प्रकरण हे नवीन नावाने थर्मोडायनामिक्स (Thermodynamics) ज्यामध्ये जास्तीत जास्त नवीन मुद्दे Cyclic process, P-V diagram, heat engine, refrigerator and heat pumps, Carnot cycle इत्यादी नवीन मुद्द्यांचा समावेश केला आहे.
यानंतरची प्रकरणे Wave optics यामध्ये Wave theory of light व Interference and diffraction ही दोन प्रकरणे एकत्र केली आहेत. इतर प्रकरणे Electrostatics, Current, Electicity, magnetic effect of electric current व इतर प्रकरणांमध्ये तेवढे बदल केलेले नाहीत, असा हा भौतिकशास्रातील बदल आहे.
- अशोक पतंगे (राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालय, आखाडा बाळापूर, जि. हिंगोली
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.